Health Tips
Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : लिव्हरच्या अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते कॉफी, जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Health Tips : कॉफी प्यायला अनेकांना आवडते त्यात काही लोक चवीसाठी कॉफी पिताता तर काही आळस घालवण्यासाठी. दिवसातून ३ ते ४ वेळा कॉफी प्यायची सवय अनेकांना असते. पण सतत कॉफी पिणे शरीरासाठी चांगले आहे की, वाईट याबाबत अनेकांना शंका आहे.

परंतु, कॉफीमुळे आपल्याला आरोग्याला लाभ होतो तसेच नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे. हृदयासाठी, मधुमेहसाठी कॉफी चांगली असते.चला तर मग समजून घेऊ कॉफी किती प्रमाणत घेतली पाहिजे.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यांच्या रिपोर्ट नुसार महिलांनी रोज ४ ते ५ कप कॉफी प्यायली पाहिजे ज्यामध्ये ४००मिलीग्रॅम कॉफी असायला हवी. जर महिला गर्भवती असेल तर त्यांनी कॉफी पिणे टाळावे किंवा डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. साधारणपणे सर्वांनी २ते ३ कप कॉफी रोज घेतली पाहिजे.कॉफी कशाप्रकारे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर (Benefits) जाणून घेऊया.

1. लिव्हरसाठी उपयुक्त

लिव्हरसारख्या समस्यांसाठी कॉफी खूप मदतगार आहे. रोज २ कप कॉफी प्यायल्यावर तुम्हाला लिव्हरचा त्रास होणार नाही. लिव्हरचा त्रास सारखं सारखा होत असेल तर त्याला दुर्लक्ष करून जमणार नाही बऱ्याच वेळा लिव्हर कॅन्सर (Cancer) किंवा लिव्हर सिरोसिस असण्याची शक्यता असू शकते. फॅटी लिव्हरसारख्या समस्यांना दूर ठेवण्याचे काम कॉफी करते.

Liver health

2. डिप्रेशनमध्ये फायदेशीर

आयुष्यात डिप्रेशन (Depression) सर्वांनाच येत असते. तणाव दूर करण्यासाठी कॉफी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे दिवसांतून २ कप कॉफी प्यायल्याने तुम्हाला कोणत्या ही गोष्टीचा तणाव येणार नाही. मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कॉफीचे सेवन करू शकता.

3. मधुमेहच्या (Diabetes) समस्या कमी होतील

रक्तातील ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी कॉफी आवश्यक असते.दररोज सकाळ, संध्याकाळ २ वेळा १/१ कप कॉफीचे सेवन केल्याने डायबेटिस टाईप-२ चा विकार होण्यापासून थांबवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश

PM Modi: पंतप्रधान मोदी १४ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज, १३ तारखेला वाराणसीत करणार मोठा रोड शो

SCROLL FOR NEXT