Fashion tips, how to choose footwear on leggings ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

लेगिंग्जसोबत या फुटवेअरची निवड करा

ट्रेंडनुसार लेगिंग्जवर फुटवेअर निवडण्यासाठी काही टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फॅशनच्या (Fashion) ट्रेंडनुसार विविध कपडे परिधान करत असतो. त्यातील आरामदायक आणि सहज परिधान करु शकतो ती लेगिंग्ज.

हे देखील पहा-

आपण लेगिंग्जसोबत शर्ट, टॉप, कुर्ती कुठेही घालू शकता. त्यावर आपण इंडो-वेस्टन सारखे कपडे देखील परिधान करतो. परंतु, कपड्यांची निवड करताना आपण बराच विचार करतो पण फुटवेअरचा विचार केला तर लेगिंग्जबरोबर काय घालावे हेच समजत नाही. काही वेळा आपण सर्व प्रकारच्या कपड्यांसोबत एकाच प्रकारची सँडल आपण घालतो. लेगिंग्ज ही ट्रेंडमध्ये (Trend) असली तरी तिच्यासोबत कोणते फुटवेअर घालायला हवे हे जाणून घेऊ या.

१. आपण लेगिंग्जवरती छोटी किंवा लांब कुर्ती, शर्ट किंवा पारंपारिक कपडे परिधान करीत असाल तर आपण अशावेळी ब्लॅक वेज या फुटवेअरची निवड करावी. आपण काळ्या किंवा तपकिरी रंगाचे वेज निवडले तर ते आपल्या सर्व प्रकारच्या आउटफिटवर चांगले दिसतील.

२. लेगिंग्जवर आपण वेस्टर्न आउटफिट घालत असाल म्हणजे लांब शर्ट किंवा टी-शर्ट किंवा टॉप परिधान केल्यास आपण त्यासाठी वॉकिंग शूजची निवड करु शकतो. तसेच आपण आपल्या आवडीचे स्नीकर्स खरेदी करू शकतो. आपण वर्कआउटसाठी लेगिंग्ज घेत असू तर त्यासाठी देखील स्नीकर्सची निवड करु शकतो. यासाठी आपण पांढऱ्या किंवा न्यूड बेस कलरचे स्नीकर्स निवडू शकतो.

३. लेगिंग्जवर वेस्टर्न किंवा पारंपारिक कपडे परिधान करत असाल तर त्यावर ब्लॉक हीलच्या सँडल छान दिसतील. आपण पार्टीला जात असू तेव्हा लेगिंग्जसोबत ब्लॉक हील्स उत्तम पर्याय असेल.

४. लोफर्स फुटवेअर हे आपण कोणत्याही कपड्यांसाठी परिधान करु शकतो. आपण डेनिम लूकमध्ये लोफर्स फुटवेअर घेतले तर ते फिट आणि फ्लेअर ड्रेस ते लेगिंग्जसह चांगले दिसतील.

५. आपण जर गोंधळलेले असू त्यावेळी आपण लेगिंग्जसोबत फ्लॅट सँडलची निवड करु शकतो. काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची आपण फ्लॅट सँडल खरेदी करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

SCROLL FOR NEXT