Fashion tips in Marathi
Fashion tips in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

'डे पार्टी' साठी या रंगांच्या साड्या निवडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लग्न, पार्टी किंवा आपल्या घरातील खास कार्यक्रमात आपण विशेष करुन महिला (Womens) सर्वाधिक पसंती साड्यांना देतात. त्यावर मँचिंग ब्लाउज, ज्वेलरी घालणे जणू हा त्यांचा आवडता छंद आहे.

हे देखील पहा -

कधी कधी आपण ट्रेंडनुसार (trend) साडी निवडतो पण त्याच्या रंगामध्ये आपला बराचसा गोंधळ उडतो. काही रंग दिवसा उठून दिसतात तर काही रात्री. अशावेळी आपण आपल्या आउटफिटचा रंग नेहमी काळजीपूर्वक निवडायला हवा. डे फंक्शनमध्ये आपण कोणत्या रंगाची साडी (Saree) नेसली, त्यावर ब्लाउज कोणता हवा, त्यावर आपण कोणती ज्वेलरी कॅरी करायला हवी. याविषयी जाणून घ्या

या रंगाच्या साड्या निवडा-

१. हलका निळा रंग उन्हाळ्यात खूप उठून दिसतो. अशावेळी आपण डे पार्टीसाठी या रंगाच्या साडीची निवड करु शकता. हा रंग जितका हलका असतो तितका तो आकर्षक दिसतो. या रंगाच्या साडीसोबत आपण काळा, पांढरा, पिवळा, गुलाबी, राखाडी आणि सोनेरी रंगांचे ब्लाउज कॉम्बिनेशन करू शकता. तसेच साधा लूक ठेवून आपण साधी वेणी किंवा बन्सची हेअरस्टाइल करु शकतो.

२. चिकनकारीच्या साड्या हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहेत. अशावेळी आपण त्यांना कॅज्युअल तसेच पार्टीच्या वेळी ते कॅरी करू शकतो. फंक्शन्ससाठी आपण हलक्या रंगाच्या चिकनकारी साड्यांची निवड करू शकतो. आयव्हरी कलरच्या साड्या अतिशय स्टायलिश दिसतात, त्यामुळे त्यांना डेच्या फंक्शनचा भाग बनवता येईल.

३. आपण राखाडी रंगाची चिकनकारीच्या साडीला ब्लाऊजच्या कॉम्बिनेशनसह काळ्या आणि पांढऱ्या रंगात निवडू शकतो. तर, हिरव्या रंगाच्या चिकनकारी साडीसोबत गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लाउजही खूप स्टायलिश लुक देतो.

४. फ्लोरल प्रिंट साड्या आपल्याला फंक्शन्ससाठी योग्य आहेत. डे पार्टीसाठी आपण फ्लोरल प्रिंटच्या साड्याही निवडू शकतो. पांढऱ्या बेससह फ्लोरल प्रिंटच्या साड्यांना आजकाल बरीच मागणी आहे. वेगवेगळ्या रंगांचे स्टायलिश प्लेन ब्लाउज पांढऱ्या रंगाच्या फ्लोरल प्रिंटच्या साड्यांसोबत कॅरी करता येतात. या प्रकारच्या साड्यांसोबत आपण ऑक्सिडाइज्ड कानातले कॅरी करू शकतो.

५. याशिवाय पीच, बेबी पिंक, क्रीम आणि ब्लॅक कलरच्या साड्याही डे पार्टीसाठी योग्य आहेत. ज्या आपण वेगवेगळ्या प्रसंगांनुसार स्टाइल करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT