High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

LDL cholesterol: ओट्स, ऑयली फिश, बेक्ड बीन्स, नट्स आणि जव यांसारखे पदार्थ संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्याला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शरीरातील सुमारे ८० टक्के कोलेस्ट्रॉल हे आपलं लिव्हर तयार करतं. तर उर्वरित कोलेस्ट्रॉल आपल्याला खाण्यापिण्यातून मिळतं. कोलेस्ट्रॉलचं नाव ऐकलं की अनेकांना ते फक्त वाईट कोलेस्ट्रॉल आणि त्यामुळे येणारा हार्ट अटॅक माहितीये. पण प्रत्यक्षात शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं.

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढणं किंवा खूप कमी होणं यामध्ये आहाराचा मोठा वाटा असतो. विशेषतः सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वेगाने वाढू शकतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी काही पदार्थ नियमित आहारात घेतल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होऊ शकते.

ओट्स

ओट्समध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे फायबर एलडीएल (LDL) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ओट्समध्ये असणारं बीटा ग्लूकन नावाचं फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या प्रक्रियेवर परिणाम करून त्याचं प्रमाण कमी करण्यास हातभार लावतं.

ऑयली फिश

ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले मासे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर एचडीएल (HDL) म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यासही त्यांचा फायदा होतो.

सॅल्मोन, ट्युना, सार्डिन, मॅकरेल आणि ट्राउट हे मासे कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

बेक्ड बीन्स

बेक्ड बीन्समध्ये फायबर आणि फायटोस्टेरॉल्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक आतड्यांमधून कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. परंतु बीन्स बेक करताना त्यात जास्त मीठ टाकू नये. त्याऐवजी थोडंसं ऑलिव्ह ऑइल वापरून ते बेक करणं अधिक फायदेशीर ठरतं.

नट्स

बदाम, अक्रोड यांसारख्या नट्समध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. शिवाय यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

जव

जवाची भाकरी, पोळी किंवा सत्तूचा आहारात समावेश केल्यास वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असलेला बीटा-ग्लूकॅन पित्तातील आम्लांवर परिणाम करून LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

SCROLL FOR NEXT