High cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल; फक्त आहारात 'या' 3 पदार्थांचा करा समावेश

Heart disease prevention: ओट्स, मोरिंगा आणि मेथीचे दाणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. त्यामधील फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक LDL कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यासह या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Surabhi Jayashree Jagdish

कोणाला हार्टचा त्रास होतोय, कोणाचं ब्लड प्रेशरचं वाढलंय तर कोणी कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहे. तुमच्या या सर्व समस्यांच्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे तुमची चुकीची लाईफस्टाईल. काही लोकं हृदयाच्या समस्यांपासून आराम मिळावा म्हणून घरगुती उपाय करत असतो. मात्र तुम्हाला माहितीये का की आहारात फक्त ३ पदार्थांचा समावेश केल्याने तुमच्या नसांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्ऱॉल कमी होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खाल्लं पाहिजे?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या हृदयासाठी उपयुक्त मानले जातात. यांच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

ओट्स

आपल्यापैकी अनेकांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश असतो. ओट्स खाल्ल्याने आपल्या शरीरात अनेक फायदे मिळतात. ओट्समध्ये बीटा-ग्लूकन नावाचं विरघळणारं फायबर असतं, जे शरीरातील वाईट (LDL) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. तसंच ओट्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास आणि पोटाच्या तक्रारी कमी होण्यासही मदत होते.

मोरिंगा

मोरिंगामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. हे घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, मोरिंगाचं नियमित सेवन केल्याने तणाव कमी होण्यासही मदत होऊ शकते.

मेथीचे दाणे

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली मेथी ही केवळ मसाला नसून हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. मेथीतील पोषक घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणं योग्य नाही. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक कमी करण्यासाठी पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र त्रास वाढला असेल तर डॉक्टरांची मदत घेणंही महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१० ऑगस्टला देश ठप्प होणार? CJP आणि शेतकऱ्यांचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, जाणून घ्या नवा मास्टरप्लॅन

Alu Vadi Recipe : कांदा भजीसारखी कुरकुरीत होईल अळूवडी, आताच लिहून घ्या कोकण स्पेशल रेसिपी

School Closed : विदर्भात पावसाचा हाहाकार! 'या' जिल्ह्यांत शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Ramayana : ब्रह्म मुहूर्तावर घडलं प्रभू श्री रामांचं दर्शन; माता सीतेच्या रुपात दिसली साई पल्लवी, 'रामायण'च्या ट्रेलरची तुफान क्रेझ | VIDEO

Maharashtra News Live Update: 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT