लाईफस्टाईल

Chiplun: चिपळूणच्या ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरची उल्लेखनीय कामगिरी; ३५ ॲण्ड नेक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण

Chiplun News: देशात सध्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच परिस्थितीत चिपळूणमधील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने गेल्या दीड वर्षात सुमारे ३५ हेड ॲण्ड नेक सर्जरी (२२ पुरुष आणि १३ महिला) यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chiplun News:

देशात सध्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच परिस्थितीत चिपळूणमधील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने गेल्या दीड वर्षात सुमारे ३५ हेड ॲण्ड नेक सर्जरी (२२ पुरुष आणि १३ महिला) यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.तोंडाचे, नाकाचे, थायरॉईड, पॅरोटीड आणि स्वरयंत्राच्या कर्करोगावर यशस्वी उपचार हे या संस्थेचे प्राथमिक ध्येय आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे कोकण विभागातील ओन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Latest News)

भारतात हेड आणि नेक कॅन्सर हे पुरुषांमधील सर्वात सामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. हे महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगापैकी हे चौथ्या क्रमांकावर आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात २०२२ मध्ये अंदाजे कर्करोगाच्या घटना १९ ते २० लाख असल्याचे दिसून येये, तर २०२२ च्या अहवालानुसार नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा वास्तविक घटना १.५ ते ३ पट जास्त आहेत असे स्पष्ट झाले आहे. या कर्करोगासाठी मुख्य जोखीम घटकांमध्ये तंबाखू आणि मद्यपानाचा समावेश आहे.

भारतात तंबाखूच्या वाढत्या व्यसनामुळे सर्व कर्करोगांपैकी ३०% हेड आणि नेक कर्करोग आढळून येत आहेत. ५० ते ६०% हेड ॲण्ड नेक कर्करोग हे स्थानिक पातळीवर प्रगत अवस्थेत असतात. अंदाजे ३५ लाख लोकसंख्येसह (रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगडचा दक्षिण भाग), नवीन कर्करोग रुग्णांची संख्या एका वर्षात ७००० - ८००० असण्याची अपेक्षा आहे. गेल्या दीड वर्षात, ३५ रुग्णांवर यशस्वी कमांडो शस्त्रक्रियेव्दारे उपचार झाले ज्यात २२ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे.

रुग्णांचे त्यांच्या कर्करोगाच्या टप्प्यानुसार वर्गीकरण करण्यात आले होते, पहिल्या टप्प्यात ८, दुसऱ्या टप्प्यात ५, तिसऱ्यामध्ये ६ आणि प्रगत टप्प्यात (स्टेज ४) १६ रुग्णांचा समावेश होता. शस्त्रक्रिया केलेल्या ३५ रूग्णांच्या सध्याच्या नमुन्याचा आकार पाहता, ४५-५०% रूग्ण चौथ्या टप्प्यात येतात. उपचारांमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ टीमचा समावेश आहे. हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजी विभाग लाळ ग्रंथी, मौखिक तसेच घशाची पातळी, स्वरयंत्र, थायरॉईड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी यासह विविध भागात सौम्य आणि घातक अशा दोन्ही प्रकारच्या ट्यूमर असलेल्या रुग्णांसाठी वैयक्तिक उपचार प्रदान करत असल्याची प्रतिक्रिया चिपळूणच्या ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरचे सल्लागार हेड ॲण्ड नेक ऑन्को सर्जन डॉ एहसान शेख यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

SCROLL FOR NEXT