Chinese Garlic Video  Saam TV
लाईफस्टाईल

Chinese Garlic Video : बाजारात आलाय चायनिज लसूण; पाहा व्हायरल VIDEO मागचं सत्य

Chinese Garlic in Market Viral Video : चायनिज लसूणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे? त्याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

तुम्ही लसूण खरेदी करताना चायनिज लसूण घरी आणत नाही ना? तुम्ही चायनिज लसूण खाल्लात तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं काय आहे चायनिज लसूणमध्ये. आम्ही याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात.

तुम्ही खात असलेला लसूण चायनीज नाही ना? याची खात्री करा. कारण, बाजारात बंदी असलेला आणि केमिकलवाला लसूण विक्रीला आलाय. तुम्ही हा लसूण खाल्लात तर नक्कीच आजारी पडाल एवढा भयंकर हा लसूण आहे. या लसूणचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये चायनीज लसूण कसा ओळखायचा हे दाखवण्यात आलंय.

व्हायरल व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, चायनिज लसूण दिसायला छोटा असतो. तो बनवताना सांडपाणी आणि केमिकलचा वापर केला जातो. याचा रंग हलकासा गुलाबी असतो. या लसूणला वास येत नाही. तसेच तिखटपणाही याला नसतो.

हा लसूण बाजारात दिसला तर घेणं टाळा. कारण, कमी किंमतीत मिळतो म्हणून हा लसूण खरेदी कराल तर आजारी पडाल, असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. या चायनिज लसूणमुळे पोटाचे विकार, जेवणात टाकला तर विषबाधा असे गंभीर दृष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

चायनिज लसूनला 2014 मध्येच भारतात बंदी घालण्यात आली आहे. चीनमध्ये सांडपाणी, केमिकल वापरून लसूण पीक घेतलं जातं. चायनिज लसूण लॅबमध्ये बुरशीजन्य असल्याचं आढळून आलं. चायनिज लसूण खाल्ल्याने पोटाचे विकार, अन्नातून विषबाधा होऊ शकते.

भारतात हा लसूण मोठ्या प्रमाणात यूपी आणि गुजरातच्या अनेक भागात सापडलाय. तसेच हा चायनीज लसूण जप्त देखील करण्यात आलाय. आपल्या राज्यातही चायनिज लसूण विक्रीला असू शकतो. स्वस्तात हा लसूण मिळत असल्याने मार्केटमध्ये विकला जातोय. त्यामुळे तुम्ही लसूण घेताना काळजी घ्या. आमच्या पडताळणीत चायनिज लसून बाजारात आल्याचा दावा सत्य ठरला असून, आरोग्यास हानिकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : - लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र

SCROLL FOR NEXT