Child Care Tips : वेळेनुसार लहान मुलांमध्ये बदल होने ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु अनेक वेळा मुले त्यांच्या मित्रांसोबतच नाही तर त्यांच्या परिवारांमधील आई-वडिलांसोबत सुद्धा आगाऊपणा करतात. ज्यामुळे लोकांसमोर पालकांना लाज वाटते.
लहान मुलांचा चिडचिडा व्यवहार, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित न देणे, आई वडिलांचे सांगणे नीट न ऐकणे यामुळे पालक (Parents) अतिशय त्रासून जातात. अशातच लहान मुलांच्या या खराबे व्यवहारामागचे कारण आणि त्यांना ठीक करण्याचे उपाय प्रत्येक आई-वडिलांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.
एक्सपर्ट सांगतात की, लहान मुलांच्या अशा खराब व्यवहारामागचे आणि आगाऊपणाने वागण्याचे अनेक कारणे असू शकतात. जर तुमचे मुल आगाऊपणा करत असेल आणि तुम्ही त्यांच्यावरती ओरडले असाल तर परीस्थिती आणखीनच खराब होऊ शकते. अशावेळी लहान मुलांच्या सवयी सुधारण्यासाठी तुम्ही त्यांच्या आगाऊपणाचे कारण शोधा आणि त्याचे समाधान शोधा.
लहान मुलांच्या आगाऊपणाच्या वागण्यामागे 'ही' कारणे असू शकतात :
1. कुटुंबातील (Family) लोकांचा लहान मुलांसोबत व्यवहार :
ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की लहान मुले जे काही पाहतात तेच शिकतात. घर परिवारांमधील सदस्य एकमेकांसोबत भांडण करत असतील किंवा उदास राहत असतील तर, याचा परिणाम लहान मुलावर होतो. अशावेळी प्रयत्न करा की तुमच्या लहान मुलांसमोर तुम्ही भांडण करु नका आणि त्यांना विनाकारण ओरडू नका. त्यांच्यासोबत बोलून त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा.
2. व्हिडिओ गेम :
लहान मुले (Child) त्यांच्या आसपास असणाऱ्या गोष्टींनी अतिशय संवेदनशील होतात. लहान मुले त्यांच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींकडून आणि वातावरणातील चुकीच्या सवयी खूप लवकर शिकतात. अशातच बऱ्याचदा असे पाहायला मिळते की लहान मुले व्हिडिओ गेम खेळून झाल्यानंतर खराब व्यवहार करतात. अशावेळी मुलांना एकदम टीव्ही पाण्यापासून आणि व्हिडिओ गेम खेळण्यापासून थांबू नका. उलट त्यांना हे समजवण्याचा प्रयत्न करा की कोणत्या शोमुळे त्यांच्यामध्ये बदल होत चालला आहे.
3. आत्मविश्वासची कमतरता :
अनेक आई-वडिलांची आपल्या मुलाची दुसऱ्या मुलासोबत तुलना करण्याची सवय काही जात नाही. याच कारणामुळे मुलांमधील आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि ते स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखतात. ज्याचा परिणाम त्यांच्या व्यवहारामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये तुलना अजिबात करू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.