Child care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care Tips : मुलांची हाडे सतत दुखताय? असू शकते 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता, वेळीच आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हवा तेवढा मिळत नाही.

कोमल दामुद्रे

Child Care Tips : व्हिटॅमिन-डी मिळवण्याचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश आहे. यामुळे हाडे मजबूत राहतात. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हवा तेवढा मिळत नसल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते अशा वेळेस मुलांच्या हाडांवर त्यांचा परिणाम होऊन ती कमजोर होऊ शकतात.

त्यामुळे व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे त्यांच्या शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळेल. कोणत्या पदार्थातून व्हिटॅमिन डी मिळेल. त्याबद्दल माहिती सविस्तरपणे दिलेले आहे.

1. दुग्धजन्य पदार्थ

व्हिटॅमिन (Vitamin) डी चे खूप चांगले प्रमाण असणारे डेअरी उत्पादन म्हणजे पनीर. एक ग्लास दूध पिल्याने व्हिटॅमिन डीची गरज पूर्ण होण्यास मदत होते. चीज चपाती सोबत देऊन मुलांच्या शरीरात व्हिटॅमिन डी चे प्रमाण वाढवू शकता. दही व्हिटॅमिन डी ने समृद्ध असलेला पदार्थ आहे. त्यामुळे मुलांच्या (Child) आहारात दहीचा समावेश केल्याने त्यांच्या आरोग्य (Health) चांगले राहील.

2. संत्र्याचा रस

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी चे मुबलक प्रमाणात जे आपल्या आरोग्यसाठी चांगले आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.तसेच यात व्हिटॅमिन डी सुद्धा भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन डी चा पुरवठा संत्री करू शकते त्यामुळे मुलांना रोज एक संत्री खायला दिल्यास त्यांच्या शरीरातली व्हिटॅमिनची कमी पूर्ण होईल. जर संत्री आवडत नसेल तर संत्र्याचा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये पोटॅशियम देखील आढळते जे मुलांच्या विकासासाठी मदत करते.

Vitamin D

3. मशरूम

मशरूमचे आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात व्हिटॅमिन डी मशरूममध्ये भरपूर प्रमाणात असते. लहान मुलांच्या आहारात मशरूम चा समावेश केल्याने त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता वाढते.फक्त मुलांसाठीच नाही तर प्रौढांसाठी देखील मशरूम फायद्याचे ठरते. मशरूम मधील भरपूर पोषक तत्वांचा चांगल्या आरोग्यासाठी मदत होईल.

4. अंडी खाल्ल्याने फायदा होईल

दुधाप्रमाणेच अंड्यामध्ये देखील व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. अंड्याचा वरील पांढरा भाग त्यामध्ये व्हिटॅमिन डी असते जर रोज त्याचे सेवन केले तर व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण होईल. जर तुमच्या मुलांना दूध (Milk) घ्यायला आवडत नसेल तर त्यांना रोज एक अंडे खायला दिले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

SCROLL FOR NEXT