Child Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care Tips : मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखायचे आहे ? 'हे' पदार्थ मुलांच्या ताटात वाढा

डोळे दुखी, डोळ्यात सतत काही टोचणे किंवा चश्मा लागतो. अशावेळी पालकांनी मुलांच्या ताटात कोणते पदार्थ ठेवायला हवे हे जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Child Care Tips : हल्ली मुलांचा स्क्रीन टाइन हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ही चिंता पालकांमुळे उभी राहिली.

मुले खाताना, खेळण्यासाठी किंवा आपले कोणतेही काम त्यांच्याकडून करुन घ्यायचे असेल की, मोबाइलचा हट्ट करु लागतात. अशावेळी पालकांना देखील त्यांना नाही बोलता येत नाही. याशिवाय मुलांच्या आरोग्यात इतर अनेक समस्या वाढू लागल्या आहेत.

अनियंत्रित मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या समस्यांमुळेही मोतीबिंदू होऊ शकतो. हळूहळू मुलांच्या (Child) डोळ्यांची दृष्टी धूसर होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांना डोळे दुखी, डोळ्यात सतत काही टोचणे किंवा चश्मा लागतो. अशावेळी पालकांनी मुलांच्या ताटात कोणते पदार्थ ठेवायला हवे हे जाणून घेऊया

१. डोळ्यांसाठी गाजराचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. त्यात बीटा-कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते, ज्याचे शरीर जीवनसत्त्व ए मध्ये रूपांतरित करते. गाजर आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, ज्यामुळे ते डोळ्यांच्या समस्या कमीत कमी ठेवण्यास मदत करतात.

२.रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये कॅरोटीनॉइड्सद्वारे पिवळे, लाल आणि केशरी रंगद्रव्ये तयार होतात. सहसा, हे पदार्थ कच्चे खाल्ले जातात, आपण ते उकळवून देखील खाऊ शकता. खरबूज, रताळे, हिरवी मिरची, ब्रोकोली, पपई, आंबा आणि भोपळा यामध्ये बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व ए सारखे कॅरोटीनॉइड असतात, जे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले असतात.

३. मोसंबी, पेरू, आवळा इत्यादी लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळते. हे जीवनसत्त्व क रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त, हे नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते, ज्यामुळे डोळ्यांच्या दाहक रोगांशी लढण्यासाठी ते फायदेशीर आहे.

४. ओमेगा -३ फॅटी ऍसिड डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते. ओमेगा -३ फॅटी ऍसिडचे उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे ट्यूना, कॉड, सॅल्मन, कोळंबी, ट्राउट, फ्लेक्ससीड तेल आणि पालक. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा मासे खाणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांचे पोषण होऊ शकते.

५. अनेक बिया आणि शेंगदाणे जीवनसत्त्व ई मध्ये समृद्ध असतात, जे एक अँटी-ऑक्सिडेंट आहे. हे डोळ्यांच्या (Eye) पेशींच्या पडद्याचे रक्षण करते. त्यामुळे बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया आणि शेंगदाणे तुमच्या आहाराचा भाग बनवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT