Child Care Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care : तुमच्या बाळाची हाडे कमजोर आहेत? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, दूडूदूडू धावू लागतील !

जन्मलेल्या बाळाला जीवनसत्त्व ड औषध किंवा कोवळ्या उन्हात बसण्यासाठी डॉक्टर आपल्याला सुचवतात.

कोमल दामुद्रे

Child Care : मुलांच्या वाढीसाठी व विकासासाठी आपल्याला त्याच्या आहारात योग्य पोषण तत्वांची गरज असते. त्यासाठी आपण त्यांना अनेक आरोग्यदायी पदार्थ खाऊ घालतो.

मुलांच्या विकासासाठी जीवनसत्त्व ड ची अधिक आवश्यकता असते. त्यासाठी जन्मलेल्या बाळाला जीवनसत्त्व ड औषध किंवा कोवळ्या उन्हात बसण्यासाठी डॉक्टर आपल्याला सुचवतात. ज्यामुळे बाळांचे हाडे व येणारे दात हे मजबूत होतील. याशिवाय जीवनसत्त्व ड इतर अनेक शारीरिक कार्यांमध्ये योगदान देते.

मुलांच्या शारीरिक विकासात जीवनसत्त्व ड किती महत्त्वाचे आहे. हे जाणून घ्यायला हवे. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या आहारात जीवनसत्त्व ड चा समावेश करायचा असेल तर, दूध आणि सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी तुमच्या मुलाला पुरेसे जीवनसत्त्व ड मिळण्यास मदत करू शकतात हे जाणून घ्यायला हवे.

१. सॅल्मन

Salmon

सॅल्मन हे फॅटी फिश आहे आणि जीवनसत्त्व ड चा उत्तम स्रोत आहे. जंगली किंवा शेतातील सॅल्मनमध्ये जीवनसत्त्व ड च्या प्रमाणात मोठा फरक आहे. जंगली सॅल्मनमध्ये अधिक जीवनसत्त्व ड असते. यासाठी याचे सेवन आईने केल्यास बाळाला त्याचा फायदा होऊ शकतो.

२. कॉड लिव्हर ऑइल

cod liver oil

कॉड लिव्हर ऑइलमध्ये देखील पुरेसे प्रमाणात जीवनसत्त्व (Vitamins) ड चे प्रमाण असते. जर आपल्याला मासे खायला आवडत नसतील तर आपण याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो. कॉड लिव्हर ऑइल घेतल्याने पुरेसे पोषक घटक मिळू शकतात. हा जीवनसत्त्व ड चा उत्कृष्ट स्रोत आहे. जीवनसत्त्व ड च्या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक वर्षांपासून याचा वापर केला जात आहे. हे मुडदूस, सोरायसिस आणि क्षयरोगावर उपयुक्त आहे.

३. अंडी

egg

तसेच अंड्यामध्ये देखील पुरेसे प्रमाणात जीवनसत्त्व ड आढळते. अंड्यातील बहुतेक प्रथिने हे पांढऱ्या भागामध्ये असते आणि चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे बहुतेक अंड्यातील पिवळ बलकमध्ये आढळतात.

४. मशरुम

mashroom

मशरूम हे जीवनसत्त्व ड च्या स्त्रोतांपैकी एक आहेत. मानवांप्रमाणे, मशरूम अतिनील प्रकाशाच्या संपर्कात असताना जीवनसत्त्व ड चे संश्लेषण करू शकतात. मशरूम जीवनसत्त्व ड २ तयार करतात.

५. दूध

Milk

गायीचे दूध (Milk) हे कॅल्शियम, फॉस्फरस आणि रिबोफ्लेविनसह अनेक पोषक तत्वांचा नैसर्गिक स्रोत आहे. १ कप फोर्टिफाइड गाईच्या दुधात प्रति कप ११५ आययू जीवनसत्त्व ड (२३७ मिली) असते.

६. संत्र्याचा ज्यूस

orange juice

जगभरातील सुमारे ६५ टक्के लोक लैक्टोज असहिष्णु आहेत आणि सुमारे २ टक्के लोकांना दुधाची ऍलर्जी आहे. त्यासाठी पर्यायी म्हणून आपण संत्र्याचा रस पिऊ शकतो किंवा सहा महिन्यानंतर बाळाला ते देऊ शकतो.

७. ओट्स

Oats

ओट्समध्ये जीवनसत्त्व ड देखील असते आणि ओट्स खूप आरोग्यदायी असतात. ओट्स दुधासोबत खाल्ल्याने त्याचा अधिक फायदा होतो. याचे ही अनेक प्रकार आपल्याला बाजारात मिळतात. बाळाला देता येत नसल्यास आईने खाल्ल्यास देखील बाळाला त्याचा फायदा होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT