Blood Sugar Level, Checking Your Blood Sugar Levels Saam tv
लाईफस्टाईल

Blood Sugar Level : रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी? जाणून घ्या

Checking Your Blood Sugar Levels : तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी? ती नियंत्रणात कशी ठेवायची जाणून घेऊया त्याबद्दल

कोमल दामुद्रे

Control Diabetes With These Home Remedies :

सध्या देशभरात आणि जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराशी अनेकजण झुंज देत आहे. मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर वाढवते. जे नियंत्रणात ठेवणे कठीण होते.

बदलेली जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप, सतत चिंता वाटणे आणि थकवा यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार होऊ शकतो. डब्ल्यूएचओच्या मते, भारतातील ६३ टक्के लोकांना मधुमेहाचा आजार (disease) जडला आहे.

मधुमेह हा आजार तुमच्या शरीरातील सर्व अंतर्गत अवयवांचे कार्य बिघडवणाऱ्या अनेक रोगांचे मूळ आहे. ज्यांना दीर्घकाळापासून थायरॉईड, शुगर आणि बीपीचा त्रास आहे. त्यांना मधुमेहासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. या आजाराची लक्षणे हळूहळू सुरु होतात. जी सुरुवातीला ओळखणे कठीण होते. परंतु, तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी? ती नियंत्रणात कशी ठेवायची जाणून घेऊया त्याबद्दल

1. रक्तातील साखरेची पातळी

  • सामान्य साखरेची पातळी : जेवणापूर्वी - १०० पेक्षा कमी, जेवणानंतर -१४० पेक्षा कमी

  • प्री- डायबिटेज: जेवणापूर्वी १००-१२५ mg/dl, जेवणानंतर – १४०-१९९ mg/dl

  • मधुमेह : जेवण करण्यापूर्वी - १२५ mg/dl पेक्षा जास्त, जेवणानंतर- २०० mg/dl पेक्षा जास्त

2. हे घरगुती उपाय करा

  • मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहाराची (Diet) काळजी घ्यायला हवी. रक्तातील साखरेची पातळी असलेल्या रुग्णांसाठी आहार हा महत्त्वाचा असतो. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा झाल्यास शरीराच्या इतर अवयवांवर वाईट परिणाम होतो.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

  • मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी कच्चा लसूण खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. लसणात असलेले एलिसिन कंपाउंड साखर नियंत्रित करण्यास गुणकारी ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT