Nation On Vacation, Clear trip Offer Saam Tv
लाईफस्टाईल

क्‍लीअरट्रिपचा Nation On Vacation समर ट्रॅव्‍हल सेल, बजेटमध्ये बुक करता येणार फ्लाइट तिकीट

Clear trip Offer : ९-दिवसीय ट्रॅव्‍हल सेलला १४ मार्च २०२४ पासून सुरूवात होत आहे आणि हॉटेल्‍स, फ्लाइट्स, बसेस् व पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स सादर करत प्रवासात बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.

साम टिव्ही ब्युरो

Flipkart Big Billion Days 2024 :

उन्‍हाळा जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप (Clear trip) या फ्लिपकार्ट कंपनीने त्यांचा बहुप्रतिक्षित मार्की ट्रॅव्‍हल सेल #NationOnVacation च्‍या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. ९-दिवसीय ट्रॅव्‍हल सेलला १४ मार्च २०२४ पासून सुरूवात होत आहे आणि हॉटेल्‍स, फ्लाइट्स, बसेस् व पॅकेजेसवर आकर्षक डिल्‍स सादर करत प्रवासात बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे.

उन्‍हाळ्यात सीझनसाठी विमानभाडे वाढण्‍याची शक्‍यता आहे. #NationOnVacation सह क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल (Travel) ग्राहकांना त्‍यांच्‍या प्लॅटफॉर्म्सवर सर्वोत्तम ऑफर्सचा फायदा घेण्‍याची आणि त्‍यांच्‍या स्‍वप्‍नवत हॉलिडेजना बुक (Book) करण्‍याची संधी देत आहेत.

क्‍लीअरट्रिप 'क्‍लीअरचॉईस'च्‍या आश्रयांतर्गत वापरकर्त्‍यांना चांगली सुविधा देत आहे. क्‍लीअरचॉईस प्‍लस आणि क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह प्रवासी त्‍यांच्‍या बुकिंग्‍ज रद्द करू शकतात किंवा त्‍यामध्‍ये बदल करू शकतात. विमानसेवा परताव्‍यांच्‍या तुलनेत संपूर्ण रिफंड मिळवू शकतात, ज्‍यांची रेंज २५०० रूपयांपासून आहे. मिंत्रा व फ्लिपकार्ट लॉयल्‍टी ग्राहक क्‍लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल व्‍यासपीठांवर स्‍पेशल ऑफर्स (Offer) व सूटचा लाभ घेऊ शकतात.

क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अय्यप्‍पन राजगोपाल म्‍हणाले, ''प्रवाशांच्‍या मनात अगोदरपासूनच प्रवासासंदर्भात नियोजन करण्‍याची भावना बिंबवण्‍याच्‍या संकल्पनेसह #NationOnVacation डिझाइन करण्‍यात आले.

आम्‍हाला गेल्‍या वर्षी नेशनऑनव्‍हेकेशनला मिळालेल्‍या प्रतिसादाचा आनंद होत आहे, तसेच सर्वोत्तम ऑफरिंग्‍जसह आम्ही ते पुन्‍हा सादर करण्‍यास उत्‍सुक आहोत, ज्‍यामुळे सर्वांसाठी उन्‍हाळा संस्‍मरणीय हॉलिडेचा अनुभव ठरेल. विमानभाडे आगाऊ नियोजन करण्‍याच्‍या तुलनेत एप्रिल व मे मध्‍ये करण्‍यात येणाऱ्या बुकिंग्‍जसाठी, तसेच आजच्‍या बुकिंगसाठी २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा आहे.

क्‍यूरेटेड व ग्राहक-केंद्रित डिल्‍ससह आमचा भारतीयांसाठी समर ट्रॅव्‍हल अधिक किफायतशीर करत त्‍याप्रती असलेल्‍या प्रेमाला साजरे करण्‍याचा मनसुबा आहे. क्‍लीअरचॉईसच्‍या माध्‍यमातून प्रवाशांच्‍या लास्‍ट-मिनिट नियोजनासंदर्भातील चिंता दूर होऊ शकतात आणि पैशांच्‍या उत्तम मूल्‍याची खात्री मिळू शकते. सर्वोत्तम डिल्‍स लॉक करण्‍यासाठी आजच बुकिंग करा, विमानभाड्यांमधील संभाव्‍य वाढीची पर्वा न करता उच्‍च दर्जाच्‍या प्रवास अनुभवाचा आनंद घ्‍या.''

1. ऑफर्स पुढीलप्रमाणे:

  • देशांतर्गत फ्लाइट्सचे भाडे ९९९ रूपयांपासून

  • आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्सचे भाडे ४९९९ रूपयांपासून

  • ५-स्‍टार हॉटेल्‍स भाडे २४९९ रूपयांपासून

  • बस बुकिंग्‍जवर जवळपास ५०० रूपयांची सूट

  • देशांतर्गत फ्लाइट्सवर ५९९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स

  • हॉटेल बुकिंग्‍जवर ३० ते ८० टक्‍क्‍यांची सूट

  • ४९ रूपयांमध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस + हॉटेल्‍सवर जवळपास १० टक्‍के अतिरिक्‍त सूट

  • १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स + हॉटेल्‍सवर जवळपास १५ टक्‍के अतिरिक्‍त सूट

वरील ऑफर्स फक्‍त मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहेत.

गेल्‍या वर्षी #NationOnVacation ला अविश्‍वसनीय यश मिळाले, जेथे २०२२ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत श्रेणींमधील बुकिंग्‍जमध्‍ये ६० टक्‍क्‍यांची वाढ झाली. क्‍लीअरट्रिप अधिकाधिक प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करण्‍याकरिता वर्षभर इंडस्‍ट्री-फर्स्‍ट व ग्राहक-केंद्रित तत्त्वांमध्‍ये गुंतवणूक करण्‍याप्रती समर्पित आहे.

अटी व नियम: कृपया आमच्‍या ऑफर्सचा लाभ व बुकिंग करण्‍यापूर्वी सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT