कोमल दामुद्रे
भारतात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत ज्यांना पाहाताच क्षणी पर्यटक प्रेमींनी भुरळ पडते.
लाँग वीकेंड आल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण कुठेतरी बाहेर फिरण्याचा प्लान करतात.
जर तुम्ही देखील लाँग वीकेंडला फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील या पर्यटनस्थळांना बजेटमध्ये भेट द्या
दिल्लीमध्ये तुम्हाला लाल किल्ला, कुतुबमिनार, जामा मशीद, इंडिया गेट यांसह अनेक पर्यटनस्थळांना भेट देता येईल.
चंदीगड हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. याच्या जवळपास अनेक हिल स्टेशन देखील आहे.
ऋषिकेशमध्ये तुम्हाला हरिद्वार, कोटद्वार, डेहरादून यांसारखी खास ठिकाणे फिरता येतील. तसेच तुम्ही या ठिकाणाहून मसुरीला जाऊ शकता.
जम्मूमध्ये तुम्ही मनसर तलाव, बहू किल्ला, नाथा टॉप, शिवखोरी, रघुनाथ मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता.