Sankashti Chaturthi 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi 2023 : जुलै महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी ? बुध्दीच्या देवतेला कसे कराल प्रसन्न, जाणून घ्या

Sankashti Chaturthi Time : यंदा ही संकष्ट चतुर्थी ६ जुलै रोजी आहे.

कोमल दामुद्रे

Ganpati Bappa Morya : संकष्ट चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास आहे, जो दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. ही संकष्ट चतुर्थी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात आल्यामुळे तिला चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते.

यंदा ही संकष्ट चतुर्थी ६ जुलै रोजी आहे. या संकष्ट चतुर्थीला गजानन संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविक सुख, शांती आणि समृद्धीसाठी श्री गणेशाची पूजा करतात.

श्रीगणेश हा भक्तांसाठी अडथळे (Problem) दूर करणारा मानला जातो. विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीला नियमानुसार उपवास केल्याने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीची तिथी आणि पूजा पद्धत

1. संकष्ट चतुर्थी तिथी

पंचागानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. तर समाप्ती मध्यरात्री ३ वाजून १२ मिनिटांनी आहे. परंतु, भारतीय पंचागानुसार (Panchang) सूर्योदयाची तिथी ही ६ जुलै रोजी मान्यात येईल. त्यासाठी चंद्रोदयाची वेळ (Time) ही सायंकाळी १० वाजून १२ मिनिटांनी संपेल.

2. संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 06 जुलै रोजी पहाटे 05.26 ते 10.40 पर्यंत आहे. या मुहूर्तावर तुम्ही गणपतीची पूजा करू शकता.

3. संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावे.

  • पूजाघर स्वच्छ करुन गंगाजल शिंपडावे.

  • गणपतीला वस्त्र परिधान करून मंदिरात दिवा लावा.

  • गणेशाला टिळक करून फुले अर्पण करावीत.

  • यानंतर गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. तुपात बनवलेले मोतीचूरचे लाडू किंवा मोदक गणेशाला अर्पण करावेत.

  • पूजा संपल्यानंतर आरती करावी आणि पूजेत झालेल्या चुकांची क्षमा मागावी.

4. संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास करून पूजा केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि धनाची प्राप्ती होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Vs India: पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेच्या अणुबॉम्बवर पाकच्या उड्या?

Independence Day: 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी का? पालिकांचा मटणबंदीचा तुघलकी फतवा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विठ्ठल- रूक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई

Airtel: कमी किंमतीत जास्त डेटा! महिन्याचा प्लॅन ६० जीबी डेटा आणि जबरदस्त बचत

खुशखबर! ICICI बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता अकाउंटमध्ये एवढे पैसे ठेवावे लागणार

SCROLL FOR NEXT