Chanakya Niti On Money Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti : पैशांची कमतरता कधीच भासणार नाही! या गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्यांनी दिला सल्ला

Chanakya Niti On Money : माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांने ध्येय निश्चित करायला हवे. यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti For Happiness And Prosperity :

माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांने ध्येय निश्चित करायला हवे. यशस्वी होण्यासाठी कधी कधी माणूस चुकीचे पाऊल उचलतो.

चाणक्य म्हणतात की, पैसे (Money) कमावण्याच्या नादात आपण अशा अनेक चुका करतो. ज्याचा आपल्याला आयुष्यात पश्चाताप करावा लागतो. तसेच वाईट संगतीचा पर्याय निवडतो. पैशांचा गैरवापर करतो. ज्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते. यामुळे सतत आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही वारंवार पैशांची कमतरता भासत असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा असे चाणक्यांनी सांगितले आहे.

1. अन्नाचा आदर

चाणक्य म्हणतात की, ज्या घरांमध्ये (Home) अन्नाचा नेहमी आदर केला जातो. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. लक्ष्मीच्या कृपेने तिथे सदैव पैसा टिकून राहातो. तसेच अन्न ज्या घरातून वाया जाते त्या ठिकाणी अन्नपूर्णा कधीच राहत नाही.

2. मोठ्यांचा आदर

चाणक्य म्हणतात की, नेहमी ज्ञानी लोकांसोबत राहा. तसेच जी लोक मोठ्यांचा आदर करतात. त्या ठिकाणी लक्ष्मीची कृपा टिकून राहाते. ज्ञानी लोकांसोबत राहिल्यास आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळते.

3. नवरा-बायकोचे नाते

चाणक्य म्हणतात की, ज्या घरात पती-पत्नी (Husband-wife) आपल्या नात्याचा आदर करतात. त्याचे नाते अधिक टिकून राहाते. तसेच अशा घरात नेहमी शांतता राहाते. ज्या घरात एकमेकांचा सन्मान केला जात नाही. त्या ठिकाणी दारिद्रय येते. ज्यामुळे लक्ष्मी देवीचा वास टिकून राहात नाही. पैशांची चणचण सतत भासते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : चंद्रपूर, गोदिंया, गडचिरोलीला रेड अलर्ट

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

SCROLL FOR NEXT