Chandra Grahan 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2023 : गर्भवती महिलांनो, जरा सांभाळून; चंद्रग्रहणात या गोष्टींची घ्या काळजी

Chandra Grahan Time : बौद्ध पौर्णिमा व चंद्रग्रहण एकाच दिवशी येत आहे. ५ मे रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण असणार आहे.

कोमल दामुद्रे

Lunar Eclipse 2023 : बौद्ध पौर्णिमा व चंद्रग्रहण एकाच दिवशी येत आहे. ५ मे रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण छायकल्प असेल. जेव्हा चंद्र सूर्य व पृथ्वीच्यामध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण होते.

या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 18 मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहण सायंकाळी 8:44 पासून सुरू होईल आणि रात्री 1:20 पर्यंत राहील.

यासोबतच त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही, तसेच कोणत्याही जीवावर त्याचा नकारात्मक परिणाम (Side effects) होणार नाही. परंतु कोणतेही ग्रहण शास्त्रात शुभ मानले जात नाही, त्यामुळे या दिवशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

1. विशेषत: गर्भवती महिलांनी (Pregnant Women) या दिवशी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे म्हटले जाते की, चंद्रग्रहणाच्या वेळी काही नकारात्मक ऊर्जा उदयास येतात, ज्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलांवर होतो. अशा परिस्थितीत, चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

2. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी खाऊ नये. असे म्हटले जाते की ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न दूषित होते. अशा स्थितीत याचे सेवन केल्याने गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आयुष्यावर परिणाम होतो. याउलट घरामध्ये आधीच शिजवलेले अन्न ठेवल्यास त्यावर तुळशीचे पान किंवा गंगेचे पाणी शिंपडावे.

3. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सुई, चाकू, कात्री या धारदार वस्तूंपासून दूर राहावे. शास्त्रानुसार त्यांचा वापर केल्यास न जन्मलेल्या बाळावर दुष्परिणाम होतात.

4. शास्त्रानुसार जेव्हा चंद्रग्रहण सुरू होते, तेव्हापासून ते ग्रहण संपेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. कारण याचा मुलावर नकारात्मक परिणाम होतो.

5. तसेच गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT