Chandra Grahan 2024, Chandra Grahan 2024 Date Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2024 : गर्भवती महिलांनो, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण; या गोष्टींची घ्या काळजी

Chandra Grahan 2024 Date : चंद्रग्रहण २५ मार्चला होळीच्या दिवशी दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसून इतर देशांमध्ये दिसणार आहे. यावेळी होळीच्या दिवशी १०० वर्षानंतर चंद्रग्रहणाचा योग तयार झाला आहे. ग्रहणाच्या छायेत होळी साजरी होणार आहे.

कोमल दामुद्रे

Lunar Eclipse 2024:

मार्च महिन्यात होळीतले पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला छायकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे.

यंदा हे चंद्रग्रहण २५ मार्चला होळीच्या दिवशी (Holi festival) दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसून इतर देशांमध्ये दिसणार आहे. यावेळी होळीच्या दिवशी १०० वर्षानंतर चंद्रग्रहणाचा योग तयार झाला आहे. ग्रहणाच्या छायेत होळी साजरी (Celebrate) होणार आहे.

होलिका दहन २४ मार्च रोजी साजरी होणार आहे. हे ग्रहण भारतात (India) दिसणार नसले तरी त्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त २४ तारखेला रात्री १०.२८ नंतर भद्रा नक्षत्राच्या समाप्तीनंतर असेल.

1. होळीच्या दिवशी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • गर्भवती महिलांनी होळीच्या दिवशी घराबाहेर पडू नये. तसेच होळीदहन ही पाहू नये.

  • ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा प्रदान होते. ज्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलांवर होतो.

  • चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी खाऊ नये. असे म्हटले जाते की, ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्नपदार्थ दूषित होते. त्यामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच याउलट घरामध्ये आधीच शिजवलेले अन्न ठेवल्यास त्यावर तुळशीचे पान किंवा गंगेचे पाणी शिंपडावे.

  • ग्रहण काळात गर्भवती महिलांनी सुई, चाकू, कात्री अशा धारदार वस्तूंपासून दूर राहावे.

  • या काळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करु नये. यावेळी खाणे, पिणे, कापणे आणि स्वयंपाक करणे इत्यादी गोष्टी करु नये.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT