OnePlus Nord CE 3 Lite 5G Saam TV
लाईफस्टाईल

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन फक्त 1,099 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या काय आहे ऑफर

Amazon Discount: OnePlus Nord CE 3 Lite 5G: 108MP कॅमेरा असलेल्या 5G OnePlus फोनवर मिळत आहे 18,900 सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

Satish Kengar

Amazon Discount On OnePlus Nord CE 3 Lite 5G:

Amazon वर सध्या कोणतीही सेल सुरू नसला तरी प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलती अजूनही उपलब्ध आहेत, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. यातच जर तुम्ही OnePlus प्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Amazon वर 108MP कॅमेरा असलेला OnePlus चा सर्वात स्वस्त फोन सध्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन किमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला फक्त फोनवर उपलब्ध असलेल्या एक्सचेंज बोनसचा लाभ मिळवावा लागेल. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

18,900 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

आम्ही सांगत आहोत तो फोन आहे OnePlus Nord CE 3 Lite 5G. हा OnePlus चा सर्वात स्वस्त फोन आहे, जो 108 मेगापिक्सेल कॅमेरासह येतो. हा फोन सध्या Amazon वर 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. पण फोनवर 18,900 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. याचा अर्थ, जर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल आणि तुम्ही त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात यशस्वी असाल, तर ऑफरनंतर फोनची किंमत 1,099 रुपये असेल.  (Latest Marathi News)

AMOLED डिस्प्ले आणि जबरदस्त रॅम

रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत, फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज. फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅमसाठी सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये 6.72-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी प्लस (1080×2400) रिझोल्यूशनला सपोर्ट करतो.

कॅमेरा आणि बॅटरीही दमदार

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे, यासोबत 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे. फोन Qualcomm Snapdragon 695G प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि OxygenOS वर आधारित Android 13 वर काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT