Chanakya Niti On Money Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Money : या घरात सतत खेळता राहातो पैसा; देवी लक्ष्मी देखील असते प्रसन्न, 3 गोष्टीचे करा पालन करा

Chanakya Niti Advice: जाणूनबुजून किंवा नकळत एखादी व्यक्ती अशा अनेक चुका करते ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते.

कोमल दामुद्रे

How to earn money : आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. पैसा कमावण्यासाठी माणसाला अधिक मेहनत करावी लागते. पैसा सगळ्यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. पैशाशिवाय जीवनाला अर्थ नाही. पैसा कमावण्यासाठी माणसाला अधिक कष्ट करावे लागते परंतु, जर पैसे योग्य मार्गाने कमावले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होतील.

आचार्य चाणक्य (Chanakya) म्हणतात की, जाणूनबुजून किंवा नकळत एखादी व्यक्ती अशा अनेक चुका करते ज्यामुळे माता लक्ष्मी (Laxmi) क्रोधित होते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे पालन केल्याने देवी लक्ष्मी घरी येते.

आचार्य चाणक्‍यांची धोरणे कठोर असली तरी परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही, असे म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला चाणक्याची अशी एक नीती सांगणार आहोत, जर तुम्ही ती अंगीकारली तर तुमच्या आयुष्यात पैशांचा (Money) पाऊस पडू लागेल. माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल.

आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की तुमच्या घराकडे लक्ष्मी कशी येईल आणि घरात समृद्धी कशी येईल हे जाणून घेऊया. चला जाणून घेऊया कोणत्या उपायांनी देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहील.

1. मूर्खांवर विश्वास ठेवू नका

मुर्खाच्या शब्दाला किंमत नसते, ज्या घरात मुर्खाचे शब्द पाळले जातात, तेथे लक्ष्मी वास करत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की जे मूर्खांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचे पालन करतात त्यांना यश मिळत नाही.

2. धान्याचे कोठार

आचार्य चाणक्य सांगतात की ज्या स्वयंपाकघरातील अन्नधान्य कधीच संपत नाही त्या घरांमध्ये देवी लक्ष्मीची कृपा असते. म्हणून घरात कधीच धान्याची कमतराता भासू देऊ नका

3. कुटुंबात प्रेम ठेवा

आचार्य चाणक्य म्हणतात की ज्यांच्या कुटुंबात एकता असेल तर पैशाची कमतरता नसते आणि सुख-समृद्धी असते. घरातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना असावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT