Chanakya Niti On Human Behaviour Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Human Behaviour : या 4 स्वभावाच्या लोकांना चुकूनही देऊ नका सल्ले, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञ, सल्लागार आणि कुशल राजकारणी होते. त्यांनी नीतिशास्त्रा लिहिले आहे, ज्यामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. चाणक्यांचे हे शब्द आजही लोकांच्या जीवनात यश मिळवण्यासाठी प्रेरणा देतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाणक्यांनी नीतिशास्त्रात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांचे हे शब्द लक्षात ठेवल्यास व्यक्ती अनेक समस्यांना (Problems) मात देऊ शकतो. तसेच व्यक्ती समाधानी आणि यशस्वी जीवन जगू शकतो.

जीवनाच्या सर्व पैलूंव्यतिरिक्त, आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये काही लोकांबद्दल देखील सांगितले आहे ज्यांना चुकूनही कोणत्याही गोष्टीचा सल्ला देऊ नये, कारण असे लोक अगदी योग्य गोष्टीचा चुकीचा अर्थ लावतात. अशा लोकांना सल्ला देणे पूर्णपणे निरुपयोगी आहे. कोणत्या लोकांना सल्ला देणे टाळावे ते जाणून घेऊयात.

चुकीची व्यक्ती

स्वभावाने चुकीचे लोक नेहमी चांगल्या माणसाला आपला शत्रू मानतात. असे लोक नेहमी फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात असे चाणक्य सांगतात. जर तुम्ही त्यांना काही चांगलं बोललात तर ते तुम्हाला कोणत्याही किंमतीत चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अशा लोकांना सल्ला देणे टाळावे.

लोभी व्यक्ती

लोभी लोक पैशांच्या लोभापोटी सर्व काही करतात. लोभ आणि लालसेमुळे हे लोक चुकीच्या मार्गावर चालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अशा लोकांना सल्ला देणे म्हणजे त्यांना आपले शत्रू बनवणे. अशा स्थितीत चाणक्य म्हणतात की, लोभी माणसाला कधीही सल्ला देऊ नये.

संशय

जर पती-पत्नी एकमेकांवर संशय घेत असतील तर अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. असे लोक त्यांना पटवण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आपला शत्रू मानतात.

मूर्ख व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीला सल्ला देऊ नये, कारण मूर्ख व्यक्तीला सल्ला देणे पूर्णपणे व्यर्थ आहे. प्रवचन नेहमी समजू शकणार्‍या व्यक्तीलाच दिले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT