Chanakya Niti For Husband-Wife Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Husband-Wife : नात्यात वयातील मोठ्या फरकामुळे येऊ शकतो दुरावा, जाणून घ्या

Shraddha Thik

Chanakya Niti :

सामान्य जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. चाणक्यांनी पती-पत्नीच्या नात्याबाबत काही सल्लेही दिले आहेत, ज्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नैतिक तत्त्वांनुसार पती-पत्नीच्या वयातील फरकाचा (Difference) वैवाहिक जीवनावर काय परिणाम होतो?  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीचे नाते (Relations) सर्वात पवित्र असते. हे बंधन टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांच्या गरजा जपल्या पाहिजेत. जर पत्नीने पतीच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत तर जीवनात आनंद मिळत नाही. पती-पत्नीमध्ये नेहमी प्रेम (Love) असले पाहिजे. त्यामुळे दोघांच्या वयात फारसा फरक नसावा.

पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा

पती-पत्नीचे नाते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. दोघांच्या वयात खूप फरक असेल तर आयुष्यात अशा समस्या उद्भवतात ज्या सोडवता येत नाहीत. चाणक्य नुसार वृद्ध व्यक्तीने तरुण मुलीशी लग्न करू नये. असा विवाह फार काळ टिकू शकत नाही.

वैवाहिक जीवन फार काळ टिकणार नाही

चाणक्य नीतीनुसार, स्त्री आणि पुरुष यांच्या वयातील मोठा फरक चांगला मानला जात नाही. वयाच्या प्रचंड तफावतीने आयुष्य कष्ट करण्यात जाते. तसेच वैवाहिक जीवन फार काळ टिकत नाही. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा.

पती-पत्नीच्या वयात फक्त 3-5 वर्षांचा फरक असावा

पती-पत्नीचे नाते सर्वात पवित्र असते. हे बंधन टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांच्या गरजा जपल्या पाहिजेत. जर पत्नीने पतीच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत तर जीवनात आनंद मिळत नाही.

पती-पत्नीमध्ये नेहमी प्रेम असले पाहिजे. त्यामुळे दोघांच्या वयात फारसा फरक नसावा. एकाच वयोगटातील लोकांची मानसिकता सारखीच असते, ज्यामुळे दोघेही एकमेकांना समजून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT