Chanakya Niti For Health Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Health : आयुष्यात निरोगी राहायचं आहे? फॉलो करा या टिप्स

Health Tips : आजच्या काळात माणसाच्या शरीरात अनेक रोग वास्तव्य करतात.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आजच्या काळात माणसाच्या शरीरात अनेक रोग वास्तव्य करतात. माणूस स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अशा वेळी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आचार्य चाणक्यांनी आरोग्याबाबत काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.

जेवताना पाणी कधी प्यावे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जेवल्यानंतर जवळपास अर्धा ते एक तासानंतर पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर (Benefits) मानले जाते. जेवणादरम्यान फार कमी पाणी पिणे हे अमृत मानले जाते. त्याच वेळी, जेवणानंतर लगेच पाणी पिणे विषासारखे आहे. त्यामुळे जेवताना या गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते.

हे सर्वोत्तम औषध आहे

आचार्य चाणक्य यांनी गिलॉय (गुळवेल) हे सर्व औषधांमध्ये सर्वोत्तम औषध (Medicine) मानले आहे. या औषधाच्या सेवनाने शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते. त्याचबरोबर शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवते. ज्यांच्या दैनंदिन जीवनात गिलॉयचा समावेश होतो, त्यांना आजार होत नाहीत. त्यामुळे त्याचा प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करा.

मसाज केल्याने मिळणारे फायदे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, उत्तम आरोग्य आणि निरोगी (Healthy) शरीरासाठी आठवड्यातून एकदा संपूर्ण शरीराची मालिश केली पाहिजे. यामुळे छिद्रे उघडतात आणि आतील घाण बाहेर पडते. मसाज केल्यानंतर आंघोळ करावी. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT