Chanakya Niti For Happiness  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Happiness : सदैव आनंदी राहण्यासाठी ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्यथा...

Happiness : आजचे विश्लेषण हे जशास तसे वागले पाहिजे या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण हा कठोरपणा जीवनाचे सत्य आहे. आपल्या व्यस्त जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील.

तुमच्यासाठी आज आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या काही विचारांपैकी एका विचाराचे विश्लेषण करूयात. आजचे विश्लेषण हे जशास तसे वागले पाहिजे या वस्तुस्थितीवर आधारित आहे.

'सगळं मनावर घेतलं तर रडतच राहाल, म्हणून जे आहे तसं राहायला शिका.' आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, कोणतीही गोष्ट मनावर घेऊ नये. असे करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर दु:ख भोगावे लागते. माणसाने जे काही घडते त्याला सामोरे जावे. वास्तविक जीवनात (Life) मानवाला अनेक प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती आपल्यासारखीच वागेलच असे नाही. बर्‍याच वेळा लोक तुमच्या प्रमाणे किंवा तुमच्या सारख्या स्वभावाचे नसतात.

त्यांचा स्वभावच वेगळा नाही तर त्यांची बोलण्याची पद्धतही वेगळी असते. अशा स्थितीत, प्रत्येक गोष्ट मनावर (Mind) घेऊ नये. तथापि, असे बरेच लोक आज या जगात आहेत ज्यांचे हृदय खूप कोमल असते. ते प्रत्येक छोटी गोष्ट ते मनावर घेतात.

यामुळे त्यांना त्रास तर होतोच पण कधी कधी ते इतरांसमोर रडतातही. आपण जसे आहोत तसे न वागता तुम्ही कोणत्या व्यक्ती समोर कसे वागता हे आधी समजून घ्या आणि त्यानंतर कसे वागले पाहिजे हे ध्यानात ठेवा. अशा स्थितीत आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्ही सर्व काही मनावर घेतले तर तुम्ही रडतच राहाल, म्हणून तुम्ही समोरचा व्यक्ती कसा आहे हे बघून त्याच्या सोबत जसे आहे तसे राहायला शिका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT