Chanakya Niti For Life Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Life : या 5 गोष्टींपासून नेहमीच राहा लांब, आयुष्यातील अडचणी होतील दूर

Life Quotes : आचार्य चाणक्यांनी नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी काही नियम सांगितले आहेत.

Shraddha Thik

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन करून अनेकांनी भरपूर नाव आणि पैसा कमावला. जर तुम्हालाही या यशस्वी लोकांच्या यादीत सामील व्हायचे असेल तर या नियमांचे पालन करा.

मूर्खांपासून अंतर ठेवा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) म्हणतात की, नेहमी मूर्खांपासून शंभर पावलांचे अंतर ठेवा. मूर्खाशी कधीही वाद घालू नका. मुर्खांशी बोलून तुम्ही स्वतःचेच नुकसान करता. असे लोक तुमचा आदरही करत नाहीत, तसेच मूर्खांशी वाद झाल्यानंतर तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

तुमची कमजोरी कोणाशीही शेअर करू नका

तुमची कमजोरी कोणाला सांगू नका. आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्याला तुमची कमजोरी कळताच त्याचा फायदा घेतला जातो. म्हणूनच स्वाभिमानासाठी तुमची कमजोरी कोणाला सांगू नका.

पैशांचा आदर करा

आचार्य चाणक्य म्हणतात की पैशाचा आदर केला पाहिजे. आजच्या जगात पैसा (Money) असेल तर जीवन आहे, पैसा असेल तर आदर आणि आनंद आहे. तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचे नाही. तुम्ही किती बचत करता हे महत्त्वाचे आहे. पैशाचा कधीही दुरुपयोग करू नये.

तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की, दुसऱ्याच्या बोलण्यात लगेच येऊ नये. ऐकलेल्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नये. जर कोणी तुमच्याकडे आले आणि म्हणाले की तुमच्या प्रिय व्यक्तीने तुमच्याशी वाईट केले तर त्यांच्या बोलण्यावर कधीही विश्वास (Trust) ठेवू नका. असे लोक अनेकदा संबंध तोडतात.

इतरांकडून अपेक्षा करू नका

आचार्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर इतरांकडून अपेक्षा करू नका. हे करणे अवघड असले तरी तरीही तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता आणि आसक्तीपासून दूर राहिल्यास यशाच्या पायऱ्या चढण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supermoon Date And Time: चंद्र येणार पृथ्वीच्या अगदी जवळ... सुपरमून दिसणार, कधी आणि किती वाजता? जाणून घ्या

Hindu Wedding Ritual: लग्नामध्ये नवरी वराच्या डाव्या बाजूला का बसते? कारण काय?

शीतल तेजवानीच्या मुसक्या आवळल्या, गोरगरिबांच्या जमिनी हडपणाऱ्या मास्टरमाईंडचे काळे कारनामे समोर

Samantha Ruth Prabhu: समांथा रूथ प्रभूच्या लग्नातले अनसीन फोटो व्हायरल, पाहा सुंदर PHOTO

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT