Chanakya Niti For Success Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti For Success : आयुष्यात यशस्वी होण्यापासून कुणाही रोखू शकणार नाही, चाणक्यांनी सांगितलेला सोपा मार्ग निवडा

Success In Life : आचार्य चाणक्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीसाठी प्रकाशासारखी आहेत ज्याचा तो अंधारात शोध घेतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांची धोरणे एखाद्या व्यक्तीसाठी प्रकाशासारखी आहेत ज्याचा तो अंधारात शोध घेतो. या धोरणांचे पालन केल्याने व्यक्तीला यशाचा मार्ग सापडतो.

कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम खूप महत्त्वाचे असतात, परंतु कठोर परिश्रमाशिवाय चाणक्यांनी एक गोष्ट सांगितले आहेत ज्याशिवाय यश मिळणे अशक्य आहे. यश (Success) मिळवण्याचा मंत्र चाणक्यांनी दिली आहे तो जाणून घेऊया.

"जोपर्यंत तुम्ही धावण्याची हिंमत वाढवत नाही तोपर्यंत स्पर्धा जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य होईल" - आचार्य चाणक्य

चाणक्याने या विधानात यश मिळविण्याचा मूळ मंत्र सांगितला आहे. चाणक्याच्या मते, जो व्यक्ती काम सुरू करण्याआधीच हार मानतो, तो ते पूर्ण करण्याचे धैर्य दाखवू शकत नाही, त्याचा पराभव निश्चित असतो.

धैर्य हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. यश मिळवण्याच्या शर्यतीत एक टर्निंग पॉइंट नक्कीच येतो जेव्हा माणसाला धैर्य दाखवावे लागते, अशा वेळी जर त्याने हार मानली तर तो जिंकलेला खेळ गमावू शकतो.

धैर्यवान व्यक्तीला प्रत्येक समस्येला कसे सामोरे जावे हे माहित असते. हा एक असा गुण आहे जो तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्याची हिंमत देतो, धैर्याची कास धरणाऱ्याला यशस्वी (Successful) होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हिंमत ही माणसाची सर्वात मोठी ताकद असते, जेव्हा सर्व बाजूंनी निराशा येते आणि केवळ धैर्याचा आधार असेल तर माणूस अंधारातून स्वतःला बाहेर काढू शकतो.

आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे, प्रत्येक कठीण क्षणाला सामोरे जाण्याची हिंमत माणसात असेल तर यश त्याच्या पायांचे (Legs) चुंबन घेते. धैर्याबरोबरच शहाणपण माणसाचे भविष्य ठरवते. या स्पर्धेच्या युगात ज्याच्यात हिंमत नाही तो खूप मागे राहील, आयुष्याच्या शर्यतीत पराभव निश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Kidney failure warning signs: किडनी फेल झाल्यानंतर फक्त रात्रीच्या वेळी दिसतात 'हे' बदल; 90% लोकं करतात इग्नोर

SCROLL FOR NEXT