Career Tips : असं म्हटले जाते की, तरुण वयात केलेल कष्ट हे उतार वयात कामी येतात. त्यासाठी या वयात अधिक मेहनत केलेली बरी. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला योग्य करिअर निवडणे देखील गरजेचे असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तुम्ही तुमच्या करिअरच्या मार्गावर असाल तर योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यात वेगळे काही करत नाहीत. त्यांच्याकडे आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास असतात. पण त्यांची प्रत्येक काम करण्याची पद्धत वेगळी असते. ते त्याच्या जीवनशैलीबद्दल खूप संयमी असतात. अशावेळी आपण करिअरला कशाप्रकारे दिशा द्यायला हवी हे जाणून घेऊया.
1. कठोर परिश्रम
जीवनात पुढे जाण्यासाठी आणि करिअरला (Career) योग्य वळण देण्यासाठी तुमच्या कामात मेहनत घ्या. नेहमी सक्रिय मोडमध्ये रहा. तसेच, योग्य वेळी (Time) काम करण्याचा प्रयत्न करा. नियमित सराव आणि मेहनत यामुळे ऑफिसमध्ये तुमची ओळख लवकरच होईल. यामुळे तुम्हाला कमी कालावधीत तुमच्या करिअरला नवे वळण देता येईल.
2. मार्गदर्शन गरजेचे
जीवनात पुढे जाण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी कामाच्या ठिकाणी गुरूचा शोध घ्या. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला खूप काही शिकता येईल. यामुळे तुमच्या करिअरला नवीन आकारत देता येईल.
3. प्रमोटरचे अनुसरण करा
जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रमोशन (Promotion) मिळवण्याचा विचार करत असाल तर ज्या लोकांना प्रमोशन मिळाले आहे त्यांना नक्की फॉलो (Follow) करा. त्यांच्या कार्यशैलीकडे लक्ष द्या. त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वरिष्ठांशी नम्र वागा आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा.
4. एक्सप्लोर करा
कोणतेही काम करताना आपल्याला सूर्यासारखे शिस्तबद्ध कार्यकर्ता होता यायला हवे. हे तुम्हाला तुमचे करिअर एक्सप्लोर करण्यासाठी पुरेसा वेळ देईल. यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये पुरेसा वेळ आणि संधी मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.