Chanakya Niti About Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti About Women : या कामांमध्ये महिला असतात आघाडीवर, तर पुरुष असतात नेहमीच मागे...

Women Nature : घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींमुळे तिची तारेवरची कसरत होते.

कोमल दामुद्रे

Women Good Quality : महिलांचे असे काही गुण आहेत ज्याबाबत पुरुषांना माहीत नसते. तिच्या गुणांवरुन खरेतर तिची ओळख कळते. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींमुळे तिची तारेवरची कसरत होते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, महिलांचा स्वभाव हा कोणत्याही पुरुषाला न कळण्यासारखा आहे. त्यांच्या मते स्त्रियांमध्ये असणारे गुण हे पुरुषांना माहीत नसतात. त्यामुळे त्या कोणत्याही कठीण प्रसंगात नेहमी धीराने वागतात. महिला कोणत्या बाबतीत पुरुषांपेक्षा पुढे आहेत हे जाणून घेऊया

1. हुशार

स्त्रियांचा (Women) पहिला गुण म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता. चाणक्यांच्या मते स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. कोणत्याही प्रसंगी त्यांची बुद्धिमत्ता पुरुषांपेक्षा अनेक प्रकारे चांगले कार्य करते. न घाबरता प्रत्येक समस्येला सामोरे जातात. ती कुटुंब (Family) देखील चांगल्या प्रकारे चालवते आणि आव्हानांना घाबरत नाही. यासोबतच ते आपल्या बुद्धिमत्तेने जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडतात.

2. जास्त खाण्याच्या बाबतीत

चाणक्य म्हणतात की स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त भूक लागते. ते पुरुषांपेक्षा जास्त खातात. महिलांच्या शरीराची रचना अशी असते की त्यांना जास्त कॅलरीज लागतात. त्यामुळे त्यांना भरपूर खाण्याचा सल्ला दिला जातो.

3. काळजी

चाणक्य यांच्या मते स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप हळव्या मनाच्या असतात. ते त्यांचे कुटुंबाच्या जवळ असतात आणि त्यांची काळजी घेतात. जिथे एका बाजूला पुरुष (Men) बेफिकीर असतात. तर दुसरीकडे कुटुंबातील सदस्यांना सुख-दुःखात साथ देण्यात महिला पुढे असतात. गरज पडल्यास ती कुटुंबाचा संपूर्ण भार उचलू शकते.

4. धाडसी

चाणक्य म्हणतात की, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ६ पट जास्त अधिक धैर्य असते. कोणत्याही कठीण प्रसंगी त्या धैर्याने सामोरे जातात. तिला शक्तीस्वरुप असे म्हटले जाते. तणाव सहन करण्याच्या बाबतीतही ती पुरुषांपेक्षा पुढे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT