Chanakya Niti On Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : या सवयींमुळे पती-पत्नीच्या नात्यात येतो दूरावा, नातं टिकवण्यासाठी आजच करा हे बदल

Husband Wife Relationship : पती पत्नी संपूर्ण आयुष्य प्रेम व परस्परपणे आनंदाने घालवतात. बदलत्या काळानुसार हे नातेही बदलले आहे.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : पती-पत्नीचे नाते हे आयुष्यातील सगळ्यात सुंदर नाते मानले जाते. या नात्यात, पती पत्नी संपूर्ण आयुष्य प्रेम व परस्परपणे आनंदाने घालवतात. बदलत्या काळानुसार हे नातेही बदलले आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, पती पत्नीचे एकमेकांशी भांडण होणे हे साहाजिकच आहे. परंतु, पती पत्नीच्या छोट्या छोट्या चुकांमुळे नात्यात दूरावा येतो. असे का होते पण तुम्ही विचार केला आहे का की ही छोटी भांडणे तुमचे नाते खराब करू शकतात. नात्यात आलेल्या दूरावा कसे थांबवाल जाणून घेऊया

1. एकमेकांना वेळ द्या

कोणत्याही नात्यात (Relatioship) भांडण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे परस्पर समंजसपणाचा अभाव. अशा स्थितीत वैवाहिक (Marriage) नात्यात पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ आवश्यक असतो. एकमेकांना पूर्ण वेळ द्या आणि एकत्र राहा हे तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवावे. तुम्ही कितीही व्यस्त असाल, पण तुमच्या जोडीदारासाठी (Partner) वेळ काढा. यामुळे दोघांच्याही हृदयात प्रेम कायम राहील.

2. मुलीच्या कुटुंबाला स्वतःचे समजा.

लग्नानंतर मुलगी पतीच्या घरी येते. त्यासाठी मुलांनीही तिच्या माहेरच्यांना आपलं समजून त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. असे केल्याने नात्याचे बंध अधिक घट्ट होतात. सासरच्या लोकांशी चांगले संबंध आल्याने पत्नीच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढण्यास मदत होईल.

3. एकमेकांवर विश्वास ठेवा

पती-पत्नीचे नाते विश्वासावर अवलंबून असते. विश्वासाचे बंधन जितके मजबूत असेल तितके तुमचे नाते अधिक मजबूत होईल आणि तुम्ही दोघेही आनंदी व्हाल. जर तुम्ही दोघेही काम करत असाल तर ते अधिक महत्त्वाचे ठरते. चांगल्या नात्यासाठी, एकमेकांच्या कामाचा आदर करा आणि प्रत्येक गोष्ट शेअर करा. तुम्ही असे केल्यास, तुमचे नाते वेळोवेळी चांगले होईल.

4. मित्र बना

आजच्या काळात, मित्र आमच्या हा आपल्या जवळ असतो. त्यांच्यामध्ये फक्त 1-2 लोक आहेत ज्यांच्याशी आपण आपल्या सर्व गोष्टी शेअर करू शकतो. पती-पत्नीमध्ये सारखे बंध असले पाहिजेत. एका संशोधनानुसार, जे जोडपे एकमेकांना चांगले मित्र मानतात त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते. तुम्ही दोघेही चांगले मित्र म्हणून रहा, तुमच्या गोष्टी शेअर करा. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल तर ती एकमेकांशी शेअर करा. असे केल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

5. तुमचे बोलणे कोणाशीही शेअर करू नका

पती-पत्नीने त्यांच्या वैयक्तिक गोष्टी कधीही इतरांना सांगू नये, मग ते कितीही जवळचे मित्र किंवा नातेवाईक असले तरीही. असे केल्याने तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होतो आणि तुमचा एकमेकांबद्दलचा आदर कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT