Ladli Laxmi Yojana
Ladli Laxmi Yojana  Saam Tv
लाईफस्टाईल

Ladli Laxmi Yojana : आता मुलींना मिळणार 1 लाख 43 हजार रुपये मोफत, केंद्र सरकारची घोषणा

कोमल दामुद्रे

Ladli Laxmi Yojana : देशात केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वसामान्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. ज्याचा लाखो लोक लाभ वेळोवेळी घेत असतात. सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी एक ना एक योजना राबवते, त्याचप्रमाणे आता सरकारने मुलींसाठी अशी योजना केली आहे, जेणेकरून मुलींचे आयुष्य सहज व सोपे होईल.

अशा अनेक योजना सरकार राबवत असते ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सहज निघतो. अशीच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना, जी मुलीच्या जन्मापासूनच तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलते. सरकारच्या या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला 1 लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, ही रक्कम पूर्ण दिली जाणार नाही. ही रक्कम तुम्हाला ५ हप्त्यांमध्ये दिली जाईल. आता या योजनेचा लाभ कोणाला आणि कसा मिळणार याबद्दल जाणून घेऊया

1. सरकार मुलींना आर्थिक मदत करत आहे

केंद्र सरकार (Government) आणि राज्य सरकारकडे एकापेक्षा जास्त योजना आहेत. बर्‍याचदा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसते ज्यामुळे ते त्याचा फायदा घेण्यापासून वंचित राहतात. जर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्हाला या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे.

या योजनेत कागदपत्रेही फार कमी विचारली जातात, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेंतर्गत मुलींना आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे सरकारी कार्यालयात जमा करावी लागतील.

2. लाडली लक्ष्मी योजना काय आहे?

लाडली लक्ष्मी योजना ही मध्य प्रदेश सरकारची एक योजना आहे, ज्याचा उद्देश मुलीच्या जन्माबाबत सामाजिक दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला (Girl) सरकारकडून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल. ही रक्कम थेट मुलीच्या बँक (Bank) खात्यात जमा केली जाईल. ही रक्कम 5 हप्त्यांमध्ये खात्यात जमा केली जाईल.

3. अशा प्रकारे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल

  • या योजनेअंतर्गत सरकार तुमच्या मुलीच्या नावावर ५ वर्षांसाठी ६-६ हजार रुपये जमा करते.

  • अशा प्रकारे खात्यात एकूण 30 हजार रुपये जमा होतात.

  • यानंतर तुमच्या मुलीला या योजनेतून पैसे (Moeny) मिळू लागतील.

  • या योजनेंतर्गत मुलगी सहावीत प्रवेश घेते तेव्हा पहिला हप्ता दिला जातो.

  • यावेळी तुमच्या मुलीच्या खात्यात 2000 रुपये जमा आहेत.

  • नववीत प्रवेश घेतल्यावर तुमच्या मुलीच्या खात्यात ४००० रुपये ट्रान्सफर होतात.

  • 11वी मध्ये प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये दिले जातात आणि 12वी मध्ये शेवटचा हप्ता दिला जातो.

  • त्याचबरोबर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर 1 लाख रुपये दिले जातात.

  • 1 जानेवारी 2006 नंतर जन्मलेली कोणतीही मुलगी या योजनेच्या लाभासाठी पात्र असेल.

  • या योजनेचा लाभ फक्त मध्य प्रदेशातील रहिवाशांनाच दिला जाणार आहे.

  • या योजनेच्या अटींनुसार मुलीच्या पालकांनी कर भरू नये.

4. अर्ज कसा करायचा?

  • तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला मुलीची सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागतील.

  • तुम्ही सार्वजनिक सेवा केंद्र, प्रकल्प कार्यालय किंवा कोणत्याही इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला लिंकवर जावे लागेल https://ladlilaxmi.mp.gov.in/Application/Public/Rules.aspx

  • यानंतर लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जावर क्लिक करा.

  • आता तीन पर्यायांमधून सामान्य पर्याय निवडा.

  • सर्व तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

  • आता तुम्हाला अर्ज भरून विचारलेली सर्व माहिती द्यावी लागेल.

  • यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा, तुमचा अर्ज पूर्ण होईल.

  • अर्ज केल्यानंतर, प्रकल्प कार्यालय तुमचा अर्ज मंजूर करेल.

  • अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या मुलीच्या नावे १ लाख ४३ हजार रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT