कोरोना लसींच्या मूल्यांकनाचे संसदीय समितीचे निर्देश Saam Tv
लाईफस्टाईल

#Omaicron Variet : कोरोना लसींच्या मूल्यांकनाचे संसदीय समितीचे निर्देश

डेल्टापेक्षा तब्बल 200 पटींनी जास्त संक्रामक मानल्या जाणाऱ्या या नव्या कोरोना अवतारावर कोरोना लसी किती आणि कशा प्रभावी ठरू शकतात याबाबत मूल्यांकन करण्याचे निर्देश संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत

साम टिव्ही

नवी दिल्ली : ओमायक्राॅन या घातक कोरोना व्हेरीयंटचा (Omicron Variant) देशात तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वीच्या डेल्टापेक्षा (Delta Variant) तब्बल 200 पटींनी जास्त संक्रमक मानल्या जाणाऱ्या या नव्या कोरोना (Corona) अवतारावर कोरोना लसी (Corona Vaccine) किती आणि कशा प्रभावी ठरू शकतात याबाबत मूल्यांकन करण्याचे निर्देश संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. Central committee orders valuation of corona vaccine

दरम्यान ओमायक्रॉनची लागण झाली की नाही हे समजण्यासाठीची जीनोम सिक्वेनसिंग तपासणी प्रक्रिया अतिशय किचकट आणि संथ मानली जाते आणि सध्या संपूर्ण देशात पुण्यात ही तपासणी करण्याची सुविधा आहे. गुजरातमध्ये (Gujrat) झिंबाब्वेतून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्राॅनची लागण झाल्याचे त्याच्या जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीतून झाल्याचे सांगण्यात आले. ओमायक्राॅनचा हल्ला झालेला देशात कर्नाटकातील दोघांपाठोपाठ हा तिसरा रुग्ण आहे. दक्षिण आफ्रिकेतून जामनगरला आलेला हा 72 वर्षांचा व्यक्ती असल्याचे गुजरात आरोग्य सचिव मनोज अग्रवाल यांनी सांगितले.

याशिवाय दक्षिण आफ्रिकेतून दिल्ली आणि मुंबईसह देशभरात आलेल्या हजारो प्रवाशांपैकी किमान पंचवीस ते तीस जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राजस्थानात दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबातील सर्व चार आणि गुजरातेतल्या सुरत मधील श्रीनाथ सोसायटीत एकाच कुटुंबातील तीनही सदस्य कोरोना पॉझिटिव आढळले आहे. त्यांचेही नमुने पुण्याला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुजरात मधील पती-पत्नींनी तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

देशात सध्या कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबतचे धोरण याच आठवड्यात केंद्रातर्फे जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांवर ओमायक्रॉनचा हल्ला कितपत होईल आणि या नव्या व्हेरियंटवर भारतीय लसी किती प्रमाणात प्रभावी ठरतील याचे मूल्यांकन करण्याची सूचना संसदीय समितीने केली आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने तातडीने अहवाल द्यावा असेही निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच बूस्टर डोसबाबत अभ्यास गटाचे काम वेगाने सुरू केले आहे.

Edited By - Amit Golwalkar

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT