Celebration of 75th Independence Day, First women pilot
Celebration of 75th Independence Day, First women pilot ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Celebration of 75th Independence Day : भारताची पहिली महिला पायलट, वयाच्या २२ व्या वर्षी केला अनोखा विक्रम !

कोमल दामुद्रे

Celebration of 75th Independence Day : भारताला स्वतंत्र करण्यामागे अनेक महिलांचा हात आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इतिहासाच्या पानात अशा अनेक महिलांची नावे जोडली गेली आहे.

हे देखील पहा -

भारताच्या (India) प्रत्येक राज्यातील प्रत्येक भागातील स्वत:ची कथा व त्याचा संघर्ष आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मनाई होती. त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकताना त्यांना अनेक वेळा विचार करावा लागे. अशा वेळी आपल्या पंखात भर घालणारी व्यक्ती ठरली उषा सुंदरम. सध्या वैमानिक क्षेत्रात पायलट महिलांची संख्या जास्त आहे. १९४७ मध्ये प्रेम माथूर हे देशांतर्गत विमान उड्डाण करणारे पहिले भारतीय व्यावसायिक वैमानिक ठरले. त्याच वेळी, दुर्बा बॅनर्जी १९५६ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या पहिल्या महिला पायलट बनल्या. पण आज आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारताच्या पहिल्या उषा सुंदरम यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

उषा सुंदरम या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला (Women) पायलट होत्या. पण असे म्हटले जाते की त्यांनी लहानपणापासूनच अनेक महत्त्वाच्या घटना आणि मिशन्सची सोय केली आणि त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने उड्डाण करण्यास सुरुवात केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. असे म्हटले जाते की वयाच्या २० व्या वर्षी उषा सुंदरमने विमान उडणे शिकले. त्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी उषा सुंदरम यांनी पिस्टन-इंजिनसह इंग्लंडहून भारतात सर्वात वेगवान उड्डाण करण्याचा विश्वविक्रम केला.

उषा सुंदरम या १९४८ मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला पायलट होत्या. पण सरला ठकराल १९३६ मध्ये लाहोर फ्लाइंग क्लबसाठी उड्डाण करणारी देशातील पहिली महिला होती. उषा यांनी १९५१ मध्ये शेवटचे विमान कमांड केले होते. यादरम्यान तिने पायलट-पतीसह लंडन ते चेन्नई २३ तासांचे उड्डाण करून अनोखा विक्रम केला होता. आजही पिस्टन इंजिन असलेल्या विमानाचा हा विक्रम कायम आहे. यानंतर ती द ब्लू क्रॉस ऑफ इंडियाची सह-संस्थापक बनली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उषा यांनी अनेक वर्ष विमान उडवून महिला पायलट होण्याचा मान पटकावला. तसेच, निवृत्तीपूर्वी उषानेही लोकांचे प्राण वाचवण्याचे धाडस केले होते. इतिहासानुसार, भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी आणण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी १९५२ मध्ये निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्यांनी विमान क्षेत्राचा निरोप घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT