Viral Fever Saam Tv
लाईफस्टाईल

Viral Fever :मुंबईकरांनो, ताप येतोय पण डेंग्यू-मलेरिया नाही; ही लक्षणे दिसल्यास वेळीच घ्या काळजी

Viral Fever In Mumbai: मुंबईत बदलत्या वातारणामुळे आजारपण वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Fever Symptoms:

सध्या वातावरणात खूप बदल झालेले पाहायला मिळत आहेत. उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. ऐन नोव्हेंबरमध्ये उन्हाळा सुरु झाल्याचे वाटत आहे. त्यामुळे अनेकांना आजारांचा सामना करावा लागत आहे. या वातावरणामुळे मुंबईत सध्या तापाचे रुग्ण वाढताना दिसत आहे.

बदलत्या वातारणामुळे आजारपण वाढत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत अनेक नागरिकांना ताप, सर्दी, खोकला अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. हा ताप सामान्य नसून यात पुरळ येणे, डोकेदुखी अशी अनेक लक्षणे दिसून आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत खूप लोकांना या तापाची लागण झाल्याचे दिसत आहे. साधारणपणे ९९ ते १०२ अंशादरम्यान हा ताप ४-५ दिवस राहतो. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी संपूर्ण अंगावर पुरळ उठणे, डोळ्यात जडपणा येणे, सतत डोकेदुखी आणि झोपेची अस्थिरता अशा अनेक समस्या निर्माण होतात.

ही सर्व लक्षणे जरी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारांशी असली तरी रुग्णांची टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माहिती दिली. संबंधित लक्षणे डेंग्यू असल्याचे दर्शवते. परंतु त्यांची चाचणी ही निगेटिव्ह येत असल्याचे दिसत आहे. हा ताप जवळपास दोन महिन्यांपासून पसरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत अनेकांना या तापाचा सामना करावा लागत आहे. यात अंगावर चौथ्या- पाचव्या दिवशी तापासोबत पुरळ येते. तसेच सांधेदुखीचा त्रास होतो. ही लक्षणे डेंग्यूची असली तरी टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचे बीएमसी रुग्णालयातील डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले.

एका रिपोर्टनुसार, वैद्यकीय अहवालात अनेक अनेक बदल दिसून आले आहे. या आजारात पांढऱ्या पेशींमध्ये घट झाल्याचे दिसून येते. तर लाल रक्तपेशींमध्ये वाढ होताना दिसते. असेही डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे, सातारा अन् अहिल्यानगरला अवकाळीने झोडपलं; विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस; शेतकऱ्यांचं उरलं-सुरलं पीकही...

CM फडणवीसांकडून संभाजीनगरला मोठं गिफ्ट! EV चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प अन् AC बस; कोट्यावधी विकासकामांचे लोकार्पण

Maharashtra News Live Update: उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

DA Hike 2026: पेन्शनमध्ये थेट 3% वाढ! 60% वरून DR झाला 63%, तुमच्या खात्यात आता किती रुपये जमा होणार?

SCROLL FOR NEXT