हृदयरोग आणि स्ट्रोक या आजारांची लक्षणे आता जुनी होत चालली आहेत. असे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी हृदयविकाराचा झटका येण्यामागची मुळ कारणे म्हणजे धूम्रपान, मद्यपान, वाढलेले वजन, किंवा अनुवांशिक असतात. मात्र आता या आजारांची लक्षणे बदलत चालली आहेत. कारण थकवा, छातीत अचानक चमकणे दुखणे किंवा जडपणा, अचानक श्वास घेताना त्रास होणे अशी साधी वाटणारी लक्षणेही हृदयविकाराच्या सुरुवातीची चिन्हे असू शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे १.७९ कोटी लोक हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडतात. हे जागतिक मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के आहे. त्यापैकी चारपैकी पाच मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे किंवा स्ट्रोकमुळे होतात. विशेष म्हणजे, या मृत्यूंपैकी जवळपास तृतीयांश मृत्यू ७० वर्षांखालील व्यक्तींचे होत आहेत. त्यामुळे फक्त वयोवृद्ध किंवा आजारी लोकांनाच हृदयविकार होतो हा समज बाळगणे चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सध्याची ताणताणाची जीवनशैली ही झोपेच्या अभावामुळे आणि बसून राहण्याच्या सवयीमुळे हृदयावर शांतपणे परिणाम करत असते. तुम्ही पाहिलेच असेल की, धूम्रपान, मद्यपान अशी व्यसने न करणारे लोक पूर्णपणे निरोगी असतात. मात्र असे तरुणही हृदयविकाराच्या झटक्याच्या आजाराला बळी पडतात. याचं मुळ कारण म्हणजे, बदललेली जीवनशैली, सोशल मीडियाचा वापर, तणावतणाव आणि अपूर्ण झोप आणि त्यामुळे शरीरावर होणारा परिणाम आहे.
शहरी जीवनशैलीमध्ये जास्त दगदग होते. हा हृदयरोगासाठी मोठा धोका आहे. कारण मोठ्या शहरांमध्ये जास्त स्पर्धा आणि त्यामुळे ताणही जास्त असतो. तसेच लोक खाण्यामुळे किंवा व्यायामाच्या कमतरतेमुळे स्वतःच हृदयाला धोका पोहोचवतात. लोकांना शरीर सूचित करत असलेले संकेत दुर्लक्षित केले जातात, जे जीवासाठी घातक ठरू शकतात.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की वय, लिंग आणि आनुवंशिकता हे आपल्याला नियंत्रित करता येत नाहीत. पण जीवनशैली नक्की बदलता येऊ शकते. त्यामुळे नियमित व्यायाम, पौष्टीक आहार, सात तासांची गाढ झोप, ताणाकमी करण्याचा प्रयत्न आणि जास्त वेळ बसून राहण्याऐवजी अॅक्टीव्ह राहणे ही सवयी आत्मसात केल्यास हृदय सुरक्षित राहू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.