Weight Loss Tips: थुलथुलीत पोट होईल सपाट, फक्त दुपारच्या आधी ४ गोष्टी करा, दिसाल फिट

Morning Habits: वजन कमी करायचे आहे? दुपार होण्याआधी काही महत्वाच्या सवयी अंगीकारा. सकाळी उठण्यापासून योग्य आहार, पाणी पिणे, हेल्दी नाश्ता यामुळे झटपट वजन कमी होऊ शकते.
Morning habits to lose weight fast
Weight loss tips before noonsaam tv
Published On
Summary

वजन कशामुळे वाढते यावर लक्ष दिले पाहिजे.

वजन कमी करण्यासाठी सकाळी काही नियम पाळले पाहिजेत.

वजन कमी करताना जेवणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

पाण्याचे सेवन करणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या वजनावर त्याचा परिणाम होत चालला आहे. त्यामुळे वाढलेला पोटाचा घेर कमी कसा करायचा? हा गंभीर प्रश्न अनेकांना सतावत असतो. पुढे आपण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला या सर्व सवयी रोज दुपार होण्याच्या आत कराव्या लागतील. चला पुढे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे वजन वाढते याबद्दल सगळ्यांनाच माहीत असते. त्यामुळे फक्त बाहेरचे जंक फूड खाणे लोक सोडतात. पण तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात सुद्धा बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्ही योग्य पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

सकाळी लवकर उठणे (Morning Habits for Weight Loss)

कारण सकाळच्या आहाराच तुमच्या वजन कमी करण्यासाठी महत्वाचा असतो. त्यासाठी सकाळी लवकर उठून व्यायाम करावा. कारण सकाळी शरीरातील मेटाबॉसलिज्म वाढलेला असतो. याने कॅलेरी बर्न होण्यास खूप मदत होते.

Morning habits to lose weight fast
Silent Heart Attack: थकवा, पाठदुखी की सायलेंट हार्ट अटॅक? दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं

सकाळी नाश्ता करणे.

सकाळचा नाश्ता सगळ्यात महत्वाचा भाग असतो. त्याने दिवसभर तुम्हाला एनर्जी मिळते आणि मेटाबॉलिज्मचे प्रमाण सुद्धा वाढते. त्यासाठी नाश्त्यात तुम्ही फळे, दही, ओट्स, अंडी अशा हेल्दी पदार्थांचा समावेश असावा.

पाण्याचे सेवन करणे.

पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे असते. त्याने शरीरातले मेटाबॉलिज्म वाढते आणि भूकेचे प्रमाण कमी होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी १ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. तर दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

हेल्दी पदार्थांचे सेवन करणे.

दुपारच्या जेवणात तुम्ही फक्त घरी बनवलेल्या जेवणाचे सेवन केले पाहिजे. त्याने तुमचे वजन कमी व्हायला प्रचंड मदत होईल. त्यामध्ये फळभाज्या, रानभाज्या, हिरव्या पालेभाज्या, गाजर, कोबी, वरण भाताचे सेवन करु शकता. तसेच मसालेदार पदार्थ कमी खाणे शरीरासाठी योग्य ठरेल. यासवयी तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला वजन कमी झाल्याचा फरक जाणवेल.

Morning habits to lose weight fast
Ladki Bahin Yojana: लाडकींना e-KYC सक्तीची, ही ७ कागदपत्रे हवीच, अन्यथा ₹१५०० विसरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com