Car Parking Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Car Parking Tips : हे गॅझेट इंस्टॉल करून कार पार्क करा, पार्किंगच्यावेळी येणार नाही अडचण

Car Parking 360 Degree Camera : बर्‍याच लोकांना गाडी चालवताना अडचण येत नाही, पण हीच अडचण कार पार्क करताना येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Car Parking Device : बर्‍याच लोकांना गाडी चालवताना अडचण येत नाही, पण हीच अडचण कार पार्क करताना येते. जर तुम्ही गर्दीच्या रस्त्यावर गाडी पार्क करत असाल तर हे काम आणखी कठीण होऊन बसते.

कार पार्क करणे हे फारसे अवघड काम नाही पण थोडे लक्ष द्यावे लागते. तुम्हालाही कार (Car) पार्क करताना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे गॅजेट्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही तुमच्या कारमध्ये इंस्टॉल करून पार्किंग निट करू शकता.

पार्किंग सेन्सर

आजकाल जवळजवळ प्रत्येक कारमध्ये पार्किंग सेन्सर दिले जातात. काही वर्षांपूर्वी सरकारने कारमध्ये पार्किंग सेन्सर अनिवार्य केले होते. पण जर तुमची कार कमी बजेटची किंवा जास्त जुनी असेल तर तुम्ही त्यात पार्किंग सेन्सर वापरू शकता. पार्किंगच्या वेळी वाहनाच्या पुढे किंवा मागे काहीही आल्यास ड्रायव्हरला अलर्ट पाठवण्यात येते त्यामुळे पार्किंग सुरळीत होते.

मागील पार्किंग कॅमेरा

तुमच्या कारमध्ये मागील पार्किंग कॅमेरा (Camera) नसल्यास, तुम्ही ते आफ्टरमार्केट ऍक्सेसरी म्हणून विकत घेऊ शकता. कार पार्क करताना हे तुम्हाला मदत करेल. हे तुम्हाला कारच्या स्क्रीनवर मागील दृश्य दाखवते. यामुळे तुम्ही आरामात वाहन पार्क करू शकता.

360 डिग्री कॅमेरा

360 डिग्री कॅमेरा कारला आणखी प्रीमियम बनवतो. हे सध्या फक्त महागड्या कारमध्येच उपलब्ध आहे. जर तुम्ही पार्किंगमध्ये (Parking) तज्ज्ञ नसाल आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा बसवावा.

360-डिग्री कॅमेरा सेटअपमध्ये एक फ्रंट कॅमेरा, एक मागील कॅमेरा आणि कारच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी एक कॅमेरा असतो. यामुळे पार्किंगच्यावेळी सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT