Manual Car Driving Tips : मॅन्युअल कार भारतीय बाजारपेठेत बहुतेक विकत घेतल्या जातात कारण त्या किमतीच्या दृष्टीने खिशाला परवडणाऱ्या असतात. तुमच्याकडेही मॅन्युअल कार असेल तर काळजी घ्या. खाली आम्ही काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या अनेकदा लोक करतात आणि याचा वाहनाच्या लाईफवर मोठा परिणाम होतो.
मॅन्युअल गीअरने कार चालवताना या 5 चुका करू नका
ऑटोमॅटिक कार (Car) आता देशात जास्त लोकप्रिय होत आहेत, परंतु मॅन्युअल गिअररबॉक्स असलेल्या कार अजूनही मोठ्या संख्येने लोक वापरतात. मॅन्युअल गिअरबॉक्ससह कार चालवताना बहुतेक लोक अशा चुका करतात, ज्यामुळे वाहन आणि चालक दोघांचेही नुकसान होऊ शकते. येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 मोठ्या चुकांबद्दल सांगत आहोत, ज्या मॅन्युअल गिअरबॉक्ससह कार चालवताना कधीही करू नयेत.
गिअर लीव्हरला आर्मरेस्ट बनवू नका
जर तुमच्याकडे मॅन्युअल गिअर असलेली कार असेल, तर तुम्ही गिअर लीव्हरचा आर्मरेस्ट म्हणून वापर करणे टाळावे. वाहन (Vehicle) चालवताना तुमचे हात स्टिअरिंग व्हीलवर ठेवा, यामुळे तुम्ही आणि तुमचे वाहन दोघेही सुरक्षित राहतील.
क्लच पेडलवर पाय कधीही ठेवू नका
कारच्या क्लच पेडलवर पाय ठेवू नका. असे केल्याने इंधनाचा (Fuel) जास्त वापर होईल कारण ट्रान्समिशन एनर्जी नष्ट होण्याची शक्यता असते. तसेच, जर तुम्हाला अचानक ब्रेक लावण्याची गरज असेल, तर तुम्ही घाईगडबडीत ब्रेकऐवजी क्लच माराल, ज्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे डेड पेडल वापरणे, जे क्लच पेडलजवळ असते आणि आजकाल जवळजवळ प्रत्येक कारमध्ये आढळते.
स्टॉप सिग्नलवर गाडी गिअरमध्ये ठेवू नका
जर तुम्हाला स्टॉप सिग्नलवर इंजिन बंद करायचे नसेल, तर कारला न्यूट्रलमध्ये ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. स्टॉप सिग्नलवर कार गिअरमध्ये ठेवल्यास, सिग्नल हिरवा होण्यापूर्वी क्लचमधून पाय घसरण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, कार स्वतःहून पुढे जाईल आणि अपघात होऊ शकतो.
वेग वाढवताना चुकीचे गिअर वापरू नका
स्पीड वाढवताना स्पीडनुसार गियर ठेवा. लोअर गिअरमध्ये उच्च गती ठेवल्याने इंजिनवर ताण येईल आणि आवाज येईल. यामुळे इंधनाचा जास्त वापर होईल. लवकरच इंजिनमध्ये बिघाड होण्याचीही शक्यता आहे. कारचा गियर नेहमी योग्य इंजिन आरपीएम (रिव्होल्यूशन्स प्रति मिनिट) वर बदलला पाहिजे. त्यानुसार एक्सलेटर दाबले पाहिजे.
डोंगरावर जाताना क्लच पेडल धरू नका
टेकडीवर जाताना लोक सहसा क्लच दाबून ठेवतात, जे चुकीचे आहे. असे केल्याने कार गीअरविना होते. जर तुम्ही अशा प्रकारे क्लच धरला तर, ग्रेडियंट आल्यावर कार मागे जाऊ लागते. चढताना कार गिअरमध्ये ठेवा आणि गीअर बदलतानाच क्लच वापरा. सतत दाबत राहू नका.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.