Beed Politics
Beed PoliticsSaam tv

Beed Politics : बीडचं राजकारणच वेगळं; मुलाच्या विरोधात प्रचारासाठी वडील उतरले मैदानात

Beed News : बीडच्या राजकारणाची चर्चा नेहमी राज्यभरात होत असते. यावेळी मात्र काही वेगळे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे.
Published on

बीड : राजकारण म्हटले म्हणजे यात सर्वकाही विसरले जाते. अर्थात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर नातेसंबंध न पाहता निवडणूक लढविली जाते. त्यानुसार बीडमधील राजकारणात पाहण्यास मिळत आहे. याठिकाणी मुलाच्या विरोधात वडीलच प्रचारासाठी मैदानात उतरले असून मुलाऐवजी पुतण्यासाठी मत मागताना दिसून येत आहेत.  

बीडच्या (Beed) राजकारणाची चर्चा नेहमी राज्यभरात होत असते. यावेळी मात्र काही वेगळे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. बीडमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची लढत त्यांचे चुलत भाऊ डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याशी होत आहे. परंतु या लढाईत संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर हे मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे बीडमधील निवडणुकीत रंगत भरली आहे. 

Beed Politics
Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

दरम्यान नवगन राजुरी या क्षीरसागर यांच्या मूळ गावी झालेल्या सभेत रवींद्र क्षीरसागर यांनी त्यांचा मुलगा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत या निवडणुकीत पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनाच मतदान करा, असे आवाहन केले. आता थेट वडीलच मुला ऐवजी पुतण्याला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याने याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com