Car Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Car Care Tips : पावसाळ्यात तुमच्याही कारमध्ये होतो उंदरांचा सुळसुळाट? अशी घ्याल काळजी, वाचा सविस्तर

How To Protect Car From Rats : पावसाळ्यात वाहन चालवताना त्रास होतोच पण वाहनाच्या आतही समस्या असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Protect Car From Rats:

मान्सून पाऊस घेऊन येतो पण त्यासोबत अनेक समस्या येतात. पावसाळ्यात वाहन चालवताना त्रास होतोच पण वाहनाच्या आतही समस्या असते. त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पावसाळ्यात उंदीर कारमध्ये येतात , त्यानंतर वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उंदीर कारचे (Car) वायरिंग कापतात आणि इतर भागांचेही नुकसान करतात. जर तुम्हालाही तुमच्या कारमध्ये उंदिर येऊ नये असे वाटते, तर त्याच्याशी संबंधित काही टिप्स आज आपण पाहूयात, ज्या जाणून घेऊन तुम्ही तुमची कार उंदरांपासून वाचवू शकता.

पाणी साचल्याने उंदीर वाहनांच्या आत शिरतात

पावसाळ्यात जेव्हा पाऊस (Rain) पडतो तेव्हा सर्वत्र पाणी साचते, त्यामुळे उंदीर आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या आत घुसतात आणि तिथे स्वतःसाठी निवारा शोधण्याचा प्रयत्न करतात.

कारमध्ये खाद्यपदार्थ ठेवू नका

कोणत्याही ऋतूत कारमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवू नका, यामुळे उंदीर कारमध्ये येतात. तुमच्या कारमध्ये जे काही खाण्यापिण्याचे असेल ते काढून टाका जेणेकरून उंदीर तुमच्या कारमध्ये येऊ शकणार नाहीत.

अंधारात कार पार्क करू नका

उंदीर (Rats) नेहमी अंधारच्या ठिकाणी आत शिरतात. कारण त्यांना अंधार हा खूप आवडत असतो. पावसाळ्यात त्यांच्या बिलात पाणी भरल्यामुळे ते गाडीच्या आत जातात.

रॅट रिपेलेंट स्प्रे

तुमच्या गाडीत उंदीर येऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे स्प्रे ऑनलाइन वेबसाइटवरून मागवावे. याच्या मदतीने तुम्ही उंदरांना आत येण्यापासून रोखू शकता. मात्र हा स्प्रे लहान मुले आणि वृद्धांपासून दूर ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT