आजकाल अनेकांना रक्तदाबाची समस्या पाहायला मिळतेय. अशातच बीपी नॉर्मल असला की अनेकांना वाटतं की आपल्याला काही त्रास नाही. रक्तदाब नॉर्मल असला म्हणजे हृदय पूर्णपणे निरोगी आहे असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा आहे. रक्तदाब हा हृदयाच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
परंतु केवळ बीपी तपासून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहेत की नाही हे समजू शकत नाही. बीपी नेहमी नॉर्मल असतानाही हार्ट ब्लॉकेज आहे की, नाही हे कसं ओळखायचं आणि रक्ताच्या तपासण्यांमधून त्याचे संकेत मिळू शकतात का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीये.
ठाण्यातील KIMS रुग्णालयाचे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रियेच्या तज्ज्ञ डॉ. सौम्या शेखर जेनासमंत यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, बीपी नॉर्मल असणं चांगलं असलं तरी त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज नाही, असं म्हणता येत नाही. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल, चरबी आणि कॅल्शियम साचल्यामुळे अडथळे निर्माण होतात. ही प्रक्रिया सुरुवातीला शांतपणे सुरू राहू शकते. अडथळे वाढल्यानंतरच काही वेळा त्याची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे केवळ रक्तदाबावर अवलंबून राहणं चुकीचं ठरू शकतं.
डॉ. जेनासमंत यांच्या मते, हार्ट ब्लॉकेजची काही सुरुवातीची लक्षणं दिसू शकतात. मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
शारीरिक हालचाली करताना छातीत जडपणा जाणवणं.
जिने चढताना धाप लागणं
विनाकारण जास्त थकवा जाणवणं
जबडा, मान किंवा डाव्या हातात अस्वस्थता जाणवणं
मधुमेह असलेल्या काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं स्पष्टपणे दिसत नाहीत. काही वेळा कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे एखादा त्रास नवीन असेल, बराच वेळ टिकत असेल किंवा शारीरिक हालचाली करताना जाणवत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
डॉ. जेनासमंत यांच्या मते, हार्ट ब्लॉकेज शोधण्यासाठी एकच तपासणी सर्वांसाठी योग्य ठरत नाही. रुग्णाच्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या तपासण्या केल्या जाऊ शकतात.
या तपासणीत हृदयाच्या विद्युत हालचालींची नोंद केली जाते. हृदयावर ताण आहे का किंवा हृदयाशी संबंधित काही बदल झाले आहेत का, हे समजण्यास मदत होते.
या तपासणीत व्यायाम करताना हृदय कसं काम करतं, हे पाहिलं जातं. शारीरिक हालचालींमुळे हृदयावर ताण आल्यावर होणारे बदल शोधण्यासाठी ही तपासणी उपयोगी ठरतं.
या तपासणीत हृदयाची कार्यक्षमता आणि हृदयाचे स्नायू व्यवस्थित हालचाल करतात का, हे तपासलं जातं.
ही शस्त्रक्रिया न करता केली जाणारी स्कॅन तपासणी आहे. यातून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे पाहता येतात.
या तपासणीत हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम किती प्रमाणात साचलं आहे, हे समजण्यास मदत होते. कोणतीही लक्षणं दिसण्यापूर्वी रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणाऱ्या चरबीची सुरुवातीची चिन्हं ओळखण्यासही मदत होऊ शकते.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज शोधण्यासाठी ही महत्त्वाची तपासणी आहे. यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कुठे आणि किती अडथळा आहे हे समजण्यास मदत होते.
डॉ. जेनासमंत यांच्या मते, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणं, धूम्रपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा कुटुंबात हार्ट अटॅकचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी हृदयाच्या तपासण्यांबाबत विचार करावा. कोणतीही लक्षणं नसली तरी अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
वयाचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांनी हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याची प्रक्रिया अनेकदा हळूहळू सुरू होते. त्यामुळे गंभीर लक्षणं दिसण्याची वाट पाहणं धोकादायक ठरू शकतं.
जोखीम असलेल्या व्यक्तींनी किंवा विनाकारण त्रास जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेवर तपासणी, योग्य निदान आणि जीवनशैलीतील बदल यामुळे हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.