Vastu Tips Of Camphor Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Vastu Tips Of Camphor Burning: घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष दूर होतो, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. जाणून घ्या कापूराचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदे.

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्रात कापूरला विशेष महत्व आहे. घरात कापूर जाळण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानलं जातं. यामुळे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक लाभ देखील मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार कापूराच्या धुराने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ, स्वयंपाकघर आणि देवघरात कापूर जाळणं शुभ मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार, कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो तसेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कापूर देवी देवतांसाठी प्रिय मानला जातो त्यामुळे देवांचा आशीर्वाद मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार, कापूर शुभ आणि पवित्र आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक उर्जेत बदलते.

ज्योतिषशास्त्रात, कापूर धन आकर्षित करतो असं मानलं जातं त्यामुळे घरात कापूर जाळणं शुभ मानलं जात. घरात पैशाची कमतरता असेल त्यावर उपाय म्हणून दोन लवंगा आणि दोन कापूर एकत्र जाळा नंतर त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा असे केल्याने नकारात्मकता दूर होईल आणि नकारात्मकता संपताच देवी लक्ष्मी घरात वास करेल.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT