ज्यावेळी आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरात चरबी साठू लागते असा अनेकांचा समज आहे. पण हे सत्य नाहीये. झोपेत असताना किती कॅलरीज बर्न होतात हे वजन, चयापचय आणि रात्रीची चांगली झोप यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. झोपेत असताना आपण किती कॅलरीज बर्न करतो आणि त्याचे परिणाम कसे मिळवू शकतो ते पाहूयात.
प्रौढ व्यक्तींमध्ये आठ तासांच्या झोपेदरम्यान ४०० कॅलरीज बर्न करतात. मात्र परंतु जास्त मसल मास किंवा हाय मेटाबॉलिझ्म असलेल्या व्यक्ती ५०० कॅलरीज पर्यंत बर्न करू शकतात. यामुळे तुम्हाला विश्रांतीच्या वेळीही तुमचे शरीर कसं एनर्जी वापरतं हे समजतं.
रात्री ८ नंतरचं जेवण तुमच्या मेटाबॉलिझमला तितकं संथ करत नाही जितका चुकीचा आहार करतो. म्हणून, रात्रीच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष द्या.
दररोज व्यायाम केल्याने जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकतात. झोपण्यापूर्वी व्यायाम करणं देखील फायदेशीर ठरू शकतं.
वजन कमी केल्याने तुमचं मेटाबॉलिझम देखील वाढतं. तथापि, झोपण्यापूर्वी कॅफेन प्यायल्याने झोप येणं कठीण होऊ शकतं. ज्यामुळे कॅलरी बर्निंग देखील कमी होऊ शकतं.
दररोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्वी तुम्ही काही एक्टिव्हीटी देखील करू शकता. ज्यामुळे तुम्हाला झोप सहज येईल.
झोपण्यापूर्वी तुमचा फोन किंवा टीव्ही बंद करा. यामधून येणारा प्रकाश तुमच्या झोपेच्या रिदममध्ये व्यत्यय आणू शकतो.
झोपताना आपण ज्या कॅलरीज बर्न करतो त्या चरबी किंवा कार्बोहायड्रेट्समधून येतात. त्या एनर्जीचा एक स्रोत म्हणून वापरल्या जातात. परंतु तुमची एकूण ऊर्जा, स्नायूंचं प्रमाण, झोपेची गुणवत्ता आणि दररोजची एक्टिव्हीटी हे सर्वात महत्त्वाचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.