Health Warning:  
लाईफस्टाईल

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

Health Warning: देशभरातील हजारो नागरिक डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार बीपी,डायबिटीज आणि इतर आजारांवर औषधे घेत असतात.मात्र हीच औषधं गुणवत्ता चाचणीत फेल ठरली आहेत..नेमकं प्रकरण काय आहे? CDSCOच्या चाचणीत कोणती औषधं फेल ठरेलत.पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • सीडीएससीओच्या गुणवत्ता तपासणीत १५७ औषधे निकृष्ट दर्जाची आढळली.

  • बीपी, डायबिटीज आणि इतर आजारांवरील काही औषधांचा समावेश

  • रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करू नयेत.

तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी दररोज बीपी,शुगर किंवा पेनकिलरची गोळी घेत असाल. तर थांबा. हा रिपोर्ट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मेडिकल स्टोअरमधून आजारांवर उपाय म्हणून तुम्ही घेत असलेली औषधं तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकतात. होय तुम्ही बरोबर ऐकताय.देशातील औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या CDSCO नं मे 2026 च्या एका अहवालात धक्कादायक खुलासा केलाय.दैनंदिन वापरातील तब्बल 157 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल झालेत.मात्र ही औषधं फेल होण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत. पाहूयात.

काही गोळ्यांमध्ये आजार बरा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुख्य औषधी घटकांचं प्रमाण कमी होतं... तर काही औषध बनवताना होणाऱ्या चुकांमुळे ते शरीरात व्यवस्थित विरघळत नव्हते...तसंच औषधांमधील घटक योग्य नसल्यामुळे रुग्णाने ही औषधे घेऊनही त्याचा आजारावर म्हणावा तसा परिणाम होत नव्हता. यात मधुमेह आणि रक्तदाबाची औषधं, गॅस आणि अॅसिडिटीच्या गोळ्या, ताप, खोकला आणि वेदनाशामक औषधांचा समावेश होता.

मुळात जेव्हा एखादा रक्तदाब किंवा मधुमेहाचा रुग्ण निकृष्ट दर्जाचे औषध घेतो, तेव्हा त्याची शुगर किंवा बीपी नियंत्रणात राहत नाही. रुग्णाला वाटते की तो रोज औषध घेतोय, पण शरीरातील आजारावर औषध कामच करत नसल्यामुळे अचानक हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा किडनी निकामी होण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो....त्यामुळे सीडीएससीओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चाचणीत फेल झालेल्या औषधांचे 'बॅच नंबर' तपासा...आणि औषधे नेहमी अधिकृत आणि विश्वासू मेडिकल स्टोअरमधूनच खरेदी करा. अन्यथा कंपन्यांची नफेखोरी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT