Cyber Crime Alert Saam Tv
लाईफस्टाईल

Cyber Crime Alert :तुमचा फोन सुरक्षित आहे का? सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी या टीप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cyber Breach Alert:

सध्या संपूर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. इंटरनेटमुळे आपल्याला खूप जास्त फायदा होतो. परंतु अनेकदा इंटरनेटचा वापर करुन फ्रॉड होऊ शकतो. हॅकर्स तुमचा डेटा चोरु शकतात आणि त्याचा वापर इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरु शकतात. त्यामुळे मोबाईल हाताळताना, इंटरनेटचा वापर करताना काळजी घ्यावी.

आपले आधार कार्ड, मोबाईल नंबर, पत्ता आणि नाव अशा सर्व गोष्टींची आपल्या मोबाईलमध्ये माहिती असते. त्यामुळे या गोष्टींचा कोणी गैरवापर करणार नाही. याची खात्री करावी. याबाबत सरकारकडून काळजी घेण्याचे अनेकदा आवाहन करण्यात येते. एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत डार्क वेबवर तब्बल 815 भारतीयांचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे.

बिझनेस स्टॅण्डर्डच्या वृत्तानुसार, रितेश भाटिया (Cyber Crime Investigator) यांनी सांगितले की, अनेक हॅकर्सच्या ग्रुपच्या तपासात दिसून आले की, ही संख्या खूप कमी आहे. परंतु याबाबत जागरुक राहणे आणि योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

ही काळजी घ्यावी

सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी नेहमी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी मोबाईलला बायोमॅट्रिक फिंगरप्रिंट लावावे. जेणेकरुन मोबाईलमध्ये अधिक सुरक्षा मिळेल. त्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहिल. बायोमॅट्रिकच्या साहाय्याने तुम्ही तुमचे आधार कार्ड अॅप लॉक, अनलॉक करु शकतात. यासंबंधित भाटिया यांनी सांगितले की, तुम्ही www.uidai.gov.in या वेबसाइटवरुन बायोमॅट्रिकच्या साहाय्याने लॉक करु शकतात. तुमचा डेटा कधीही कोणी हॅक करु शकतात. त्यामुळे तुमची माहिती सतत चेक केली पाहिजे.

भविष्यातील सायबर हल्ल्यांपासून सावध व्हा

डेटा चोरीला जाणे हे सध्या खूप जास्त कॉमन झाले आहे. त्यासाठी नेहमी जागरुक राहायला हवे. तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही अँटीव्हायरस नाही याची खात्री करा. सॉफ्टवेअर अपडेट करताना काळजी घ्या. तसेच मेसेजमधील माहित नसलेल्या लिंक्स ओपन करु नये. तुमचे पासवर्ड नेहमी गुप्त ठेवा. तसेच नेहमी पासवर्ड अपडेट करा. बँकेचे अॅपचे पासवर्ड नेहमी अपडेट करा.

तुमचे हक्क समजून घ्या

भारतात सायबर सिक्युरिटीसाठी कायदे संविधानात नमूद केले आहेत. त्याअंतर्गत तुम्ही डेटा चोरीला गेल्याची, त्याचा गैरवापर केल्याची तक्रार करु शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT