Surya Budh Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे त्याच्या विशिष्ट वेळेनुसार परिक्रमण होत असते. महिन्याला प्रत्येक ग्रह आपली दिशा बदलत असते. याच्या परिवर्तनामुळे आपल्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही स्वरुपाची फले प्राप्त होतात.
कधी कधी एकाच राशीत दोन ग्रहांचे संक्रमण झाल्यामुळे या संयोगाला ग्रह संयोग म्हणतात ज्यामुळे बुधादित्य योग तयार होतो. ग्रहांच्या संयोगाने विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रहांचा राजा सूर्य देव १७ ऑक्टोबरला तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही दिवसात बुधही तुळा राशीत प्रवेश करेल यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. अशातच कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.
1. कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य (Budhaditya) राजयोग हा अधिक फायदेशीर ठरेल. या लोकांना आर्थिक फायदा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. उत्पन्नातही वाढ होईल. व्यावसायिकांना (Business) फायदा होईल.
2. धनु
बुधादित्य राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांनाही अनुकूल परिणाम मिळतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. पैशासंबंधित (Price) बचत करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायाबाबत नियोजन कराल
3. मकर
हा योग मकर राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. कामात प्रगती होईल. नोकरीमध्ये बढती मिळेल. व्यवसायात लाभ मिळेल. प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. नुकतेच लग्न झालेल्या सूनेच नातं सासूसोबत अधिक घट्ट होईल. नात्यात प्रेम टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न कराल.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.