Budh Gochar 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे मीन राशीत संक्रमण! ३ राशींच्या लोकांचे भाग्य खुलणार, पडेल पैशांचा पाऊस

Budh Gochar Horoscope : ७ मार्चला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा वेळोवेळी आपली राशी बदलत असतो. लवकरच बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल त्यामुळे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतील.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Meen Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण हे विशिष्ट वेळेनुसार होत असते. प्रत्येक ग्रहाचे विशेष असे महत्त्व आहे. ७ मार्चला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे.

ग्रहांचा राजा वेळोवेळी आपली राशी बदलत असतो. लवकरच बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल त्यामुळे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतील. बुध ग्रहाला संवाद, बुद्धी, विवेक, गणित आणि तर्क कारक मानले जाते. बुध ग्रहाचा प्रभाव व्यक्तीच्या बोलण्यावर आणि स्वभावावर पडतो. त्यामुळे ही व्यक्ती अतिशय बुद्धिवान आणि हुशार असते.

बुध ग्रहाचे मीन राशीत संक्रमण होणार आहे. त्याचबरोबर शुक्र देखील संक्रमण करेल. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

1. वृषभ

बुध ग्रहाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे (Money) परत मिळू शकतील. बाहेर जाण्याचा प्लान कराल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तसेच मान-सन्मानही वाढेल.

2. मिथुन

मिथुन राशीसाठी बुध ग्रहाचे संक्रमण फायदेशीर ठरेल. शेअर बाजारात गुंतवणूक लाभदायक ठरेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. करिअर (Career) संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

3. कुंभ

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश (Success) मिळेल. मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

SCROLL FOR NEXT