Budh Gochar Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar In Sinh Rashi: बुध ग्रहाचे सिंह राशीत संक्रमण! या 3 राशींच्या नशीबाचे उघडणार टाळे, कमाईच्या जबरदस्त संधी

Budh In Kundali : कुंडलीनुसार बुध तिसऱ्या व सहाव्या घरावर राज्य करतो.

कोमल दामुद्रे

Budh Gochar 2023 in Sinh Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा तर्कशक्तीचा ग्रह आहे. कुंडलीनुसार बुध तिसऱ्या व सहाव्या घरावर राज्य करतो. जेव्हा ग्रहाचे राशी परिवर्तन होते तेव्हा अनेक राशींवर त्यांचा परिणाम होतो.

बुध ग्रह हा पैसा, बुद्धिमत्ता, व्यवसाय,भाषण, संवाद, तर्क यांचा कारक असतो तेव्हा सर्व 12 राशींच्या जीवनातील या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होतो. 25 जुलै 2023 रोजी, बुधाचे संक्रमण सिंह राशीत होणार आहे. सिंह राशीत बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे मोठे बदल घडतील. बुधाचे हे संक्रमण विशेषत: 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. वृषभ :

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे (Budh) संक्रमण खूप फायदेशीर (Benefits) ठरेल. या लोकांना भरपूर पैसा मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कर्जाची परतफेड करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन घर, कार खरेदी करू शकता. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात.

2. कर्क :

बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक बुधाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना आर्थिक लाभ होईल. बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे अडकलेले पैसेही (Money) या काळात मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धैर्य आणि शौर्याच्या जोरावर तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण कराल. जीवनात भौतिक सुख वाढेल.

3. वृश्चिक:

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे परिवर्तन शुभ परिणाम देईल. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल, त्यामुळे तुमचे काम पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यावसायिकांसाठीही हा काळ चांगला आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT