Buddha Purnima 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Buddha Purnima 2024: दुःख मुक्तीसाठी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग; जीवनात नांदेल सुख शांती

Buddha Purnima 2024: भगवान गौतम बुद्धांनी दु:ख मुक्तीसाठी अष्टांगीक मार्ग सांगितले आहेत. यामध्ये ज्ञान, संकल्प, वाणी, कृती, राहणीमान, व्यायाम, स्मृती आणि समाधी या विषयांवर भाष्य केले आहे.

Ruchika Jadhav

प्रत्येक वर्षी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा बुद्ध पौर्णिमा २३ मे रोजी आली आहे. बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतासह संपूर्ण जगभरात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक घराघरात शांतीचं प्रतिक असलेल्या तथागत गौतम बुद्धांची पुजा केली जाते.

बुद्ध पौर्णिमेचं महत्व

बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्व आहे. कारण गौतम बुद्धांच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या घटना वेगवगेळ्या वर्षी मात्र एकाच दिवशी म्हणजे एकाच पौर्णिमेला घडल्या आहेत.

१. तथागत गौतम बुद्धांचा जन्म

२. दु:खातून मुक्तीची ज्ञान प्राप्ती

३. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण

या तिनही गोष्टी एकाच दिवशी घडल्या आहेत. त्यामुळे भारतासह जगभरात गौतम बुद्धांचे विचार मानले जातात आणि बुद्धीजम फॉलो केला जातो.

बुद्धांनी सांगितलेलं दु:ख मुक्तीचं कारण

बुद्धांनी दु:खाचं कारण तृष्णा असल्याचं सांगितलं आहे. तृष्णा म्हणजेच व्यक्तीच्या मनात निर्माण झालेली इच्छा. रोजच्या आयुष्यात जगत असताना व्यक्ती विविध गोष्टींशी संघर्ष करत असतो. या सर्वांमध्ये मनु्ष्याच्या मनात विविध भावना जागृत होतात. माणसाच्या मनात तृष्णा निर्माण होते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी व्यक्ती सतत त्याच्या मागे धावतो, मात्र ती न मिळाल्याने दु:ख होते. अनेक गोष्टी मिळाल्यानंतर देखील काही काळाने त्या नष्ट होतात. तेव्हा देखील माणसांना दु:ख होते.

भगवान गौतम बुद्धांनी दु:ख मुक्तीसाठी अष्टांगीक मार्ग सांगितले आहेत. यामध्ये ज्ञान, संकल्प, वाणी, कृती, राहणीमान, व्यायाम, स्मृती आणि समाधी या विषयांवर भाष्य केले आहे. सर्व व्यक्ती स्त्री, पुरूष आणि जातीमध्ये भेदभाव न करता गौतम बुद्धांनी आपल्या झालेली ज्ञान प्राप्ती या सृष्टीपर्यंत पोहचवली.

केवळ प्राणी मात्रांवर दया न करता मांस खाणे म्हणजे अपवित्रता नसते. यासोबतच व्यभिचार, कपट, कपट, मत्सर आणि इतरांची निंदा देखील माणसाला अपवित्र करते, असा उपदेश गौतम बुद्धांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

SCROLL FOR NEXT