ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डेड स्कीन काढून टाकण्यासाठी नैसर्गिक स्क्रब देखील आवश्यक आहेत. यामुळे त्वचा चमकदार होते.
अर्धा चमचा मध एक चमचा कॉफी पावडरमध्ये मिसळा आणि स्क्रब करा. यामुळे डेड स्कीन निघून जातात आणि चेहरा चमकदार राहतो.
लिंबाचा रस आणि साखर मिसळा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. हे नैसर्गिक एक्सफोलिएटर टॅनिंग आणि डलनेस दोन्ही काढून टाकते.
ओटमीलमध्ये एक चमचा एलोवेरा जेल मिसळा आणि ते स्क्रब करा. यामुळे त्वचा मऊ होते आणि डेड स्कीन निघून जाते.
एक चमचा दही आणि तांदळाचे पीठ मिसळा आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे पिग्मेंटेशन कमी होईल.
बेसन हळद आणि गुलाबजलमध्ये मिसळा आणि चेहऱ्याला लावा. या स्क्रबमुळे डेड स्कीन निघून जाते आणि चमकदार होते.
एक केळी मॅश करा, त्यात मध घाला आणि ५ मिनिटे चेहऱ्यावर स्क्रब करा. यामुळे त्वचा मॉइश्चराइज्ड होते आणि डेड स्कीन निघून जातात.