ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलं असलेल्या घरांच्या भिंती नेहमी पेन्सिल आणि रंगाचे खडूंनी बनवलेल्या चित्राने भरलेले असतात.
भिंतींवरून हे रंग काढून टाकणे तितके सोपे नाही. यामुळे भिंती खराब होतात.
परंतु या सिंपल ट्रिंक्स वापरुन तुम्ही हे डाग सहज काढू शकता. कसं, जाणून घ्या.
व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा, ते स्प्रे बाटलीत ओता आणि भिंतीवर स्प्रे करा.
बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळा, ही पेस्ट स्पंजवर लावा आणि नंतर भिंतीवर हलक्या हाताने घासून घ्या.
स्टेशनरी दुकानांमध्ये व्हाईट बोर्ड इरेजर सहज मिळते, तुम्ही भिंतींवरील रंगाचे डाग काढण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकता.